कोरोनाकाळात भाजपा आमदाराचा शाही विवाहसोहळा, अधिकारी वधुसोबत बांधली लग्नगाठ By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 05:05 PM 2021-04-27T17:05:24+5:30 2021-04-27T17:12:47+5:30
Royal wedding of a BJP MLA : भाजपाचे हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथील आमदार विशाल नैहरिया आणि एचएएस अधिकारी ओशीन शर्मा यांचा शाही विवाहसोहळा सोमवारी संपन्न झाला. सोमवारी संध्याकाळी झालेल्या विवाह सोहळ्यात दोघेही विवाह बंधनात अडकले. भाजपाचे हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथील आमदार विशाल नैहरिया आणि एचएएस अधिकारी ओशीन शर्मा यांचा शाही विवाहसोहळा सोमवारी संपन्न झाला. सोमवारी संध्याकाळी झालेल्या विवाह सोहळ्यात दोघेही विवाह बंधनात अडकले.
गद्दी समुदायाशी संबंधित असलेल्या या वधु-वरांचा विवाहसोहळा गद्दी रीतीरिवाजानुसार पार पडला.
विशाल नैहरिया आणि एचएएस अधिकारी ओशीन शर्मा यांनी हा विवाह सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी कांग्रा येथील गोजू बसनूर येथील सर्वात सुंदर मॅरेज पॅलेसची निवड केली होती.
मात्र कोरोनाच्या संसर्गाचा धोका विचारात घेऊन वधु-वरांकडून मोजक्याच लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विवाह सोहळ्यामध्ये ४०० लोकांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच या शाही विवाह सोहळ्यात शासकीय नियमांचेही उल्लंघन झाल्याची चर्चा आहे.
आमदार नेहरिया सर्वप्रथम आपल्या बंडी या मूळ गावातून वऱ्हाड घेऊन गोजू मॅरेज पॅलेज येथे आले. तिथे नववधू ओशीन शर्मा या आपल्या कुटुंबीय आणि नातेवाईकांसह उपस्थित होत्या.
वऱ्हाड विवाह स्थळाजवळ आल्यावर गद्दी समुदायाशी संबंधित असल्याचे सर्व रीतीरिवाज पार पाडण्यात आले. त्यानंतर विवाह सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी पाश्चात्य संस्कृतीचाही तडका लावण्यात आला.
मुख्यमंत्री जयराम ठाकूर या विवाह सोहळ्याला सार्वजनिकरीत्या उपस्थित राहिले नाही. मात्र त्यांनी धर्मशाला येथे येऊत विशाल नेहरिया यांना वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. उत्तीर्ण केली आहे.