युतीचा इतिहास

By admin | Published: September 22, 2014 12:00 AM2014-09-22T00:00:00+5:302014-09-22T00:00:00+5:30

आता ही युती तुटते की टिकते याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

गेल्या २५ वर्षांपासून अभंग असलेल्या महायुतीला आता तडे जाऊ लागले आहेत.

मात्र तरीही सेनेच्या भूमिकेत काहीही बदल झालेला नसून सध्या युतीमध्ये तणाव सुरू आहे.

सेनेने जराही झुकते न घेता आपल्या मागणीचा जराही विचार न केल्यामुळे नाराज भाजपा नेत्यांनी युती तोडत स्वबळावर लढण्याचा मनोदय बोलून दाखवला.

शिवसेनेने मात्र या मागणीकडे साफ दुर्लक्ष करत भाजपाला ११९ जागा देण्याचा निर्णय घेतला.

राज्यात असलेली शिवसेनेची मोठ्या भावाची आणि भाजपाची लहान भावाची भूमिका भाजपाला मंजूर नव्हती आणि त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी निम्या म्हणजेच १४४ जागांची मागणी केली.

मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे कमकुवत झालेली सेना आणि लोकसभा निवडणुकीत एकट्या लोकसभा निवडणुकीत एकट्या नरेंद्र मोदींमुळे मिळालेल्या यशानंतर महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची गरज भाजपाला वाटू लागली.

या यशामुळे येत्या विधानसभा निवडणूकीतही महायुतीला जोरदार यश मिळेल आणि पुन्हा त्यांचे सरकार सत्तेवर येईल असेच सर्वांना वाटत होते.

अवघ्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं तसंच राज्यातही महायुतीला कौल मिळाला. महायुतीने राज्यात ४२ जागा जिंकल्या.

युतीने १९९५ साली राज्याची सत्ता हस्तगत करत आपली ताकद दाखवली. - त्यानंतर युतीचा सिलसिला असाच कायम राहिला. केद्रांत भाजप तर राज्यात शिवसेना असा युतीचा अलिखित नियम दोन्ही पक्ष पाळत होते.

बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजना यांच्या पुढाकाराने २५ वर्षांपूर्वी महायुती आकारास आली. १९९०साली शिवसेना व भाजपाने प्रथमच विधानसभा निवडणुक एकत्र लढवली.

विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून शिवसेना- भाजप यांच्यामध्ये सध्या चांगलीच धुसफूस सुरू आहे. २५ वर्षांपूर्वी झालेली ही महायुती आत तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. ही युती नेमकी कधी कशी झाली त्याचा मागोवा घेऊया या छायाचित्रांमधून