Know, father chief minister & Son Minister is first time happens in politics?
जाणून घ्या, वडील मुख्यमंत्री अन् मुलगा मंत्री हे राजकारणात पहिल्यांदाच घडलंय का? By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 07:00 PM2020-01-03T19:00:39+5:302020-01-03T19:04:34+5:30Join usJoin usNext शेख अब्दुला आणि फारुख अब्दुला जम्मू काश्मीरच्या राजकारणात अब्दुला घराण्याचं वर्चस्व होतं. १९८२ मध्ये शेख अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. तर त्यांचे चिरंजीव फारुक अब्दुल्ला त्यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री होते. चंद्राबाबू नायडू आणि नारा लोकेश चंद्राबाबू नायडू यांची आंध्रप्रदेशात सत्ता आल्यानंतर त्यांनी चिरंजीव नारा लोकेशला त्यांच्या मंत्रिमंडळात सामावून घेतलं होतं. त्याच्याकडेची आयटी मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. करुणानिधी आणि स्टॅलिन करुणानिधी २००६ मध्ये पाचव्यांदा तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रिपदावर होते. तर २००९ मध्ये करुणानिधींनी स्टॅलिनला उपमुख्यमंत्री बनवले के. चंद्रशेखर राव आणि के टी रामा राव चंद्रशेखर राव तेलंगणाचे २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी मुलगा केटी रामाराव यांच्यावर आयटी मंत्रालयासह अनेक विभागांची जबाबदारी दिली. प्रकाश सिंह बादल-सुखबीर सिंह बादल पंजाबमधील प्रकाशसिंह बादल २००७ मध्ये चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात सुखबीर सिंह २००९ मध्ये उपमुख्यमंत्री केले. २०१२ मध्ये अकाली दल पुन्हा सत्तेत आले, तेव्हा वडील मुख्यमंत्री- मुलगा उपमुख्यमंत्रीपदावर कायम राहिले. देवीलाल आणि रणजित सिंह चौटाला देवीलाल चौटाला १९८७ मध्ये दुसऱ्यांदा हरियाणाचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांचे चिरंजीव रणजीत सिंह चौटाला यांच्यावर कृषिमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. टॅग्स :महाराष्ट्र सरकारशिवसेनाMaharashtra GovernmentShiv Sena