Narendra Modi Birthday:…तेव्हा मोदी म्हणाले, “मी डिबेटमध्ये येण्यास तयार आहे पण माझ्याकडे गाडी नाही”
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 10:22 IST2020-09-17T10:18:59+5:302020-09-17T10:22:48+5:30

गुजरातमधील वडनगर येथे जन्मलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. परंतु आयुष्यात गरीबी कधीही प्रगतीच्या आड येऊ दिली नाही. त्यांनी संघाच्या एका छोट्या कार्यकर्त्यापासून सुरुवात केली आणि आता देशातील सर्वोच्च पदावर पोहचले आहेत.
म्हटलं जातं की, आज ते संघटना आणि सरकारपेक्षाही मोठे झाले आहेत. त्यांना आव्हान देणारे कोणी दुसरा नेता नाही. पण असा एक काळ होता जेव्हा पक्षाने त्यांना गुजरातमधून बाहेर केले होते. पण त्यामुळे ते आणखी मजबूत झाले. हा काळ त्यांनी स्वत: ला तयार करण्यात आणि आपली ओळख प्रस्थापित करण्यासाठी वापरला.
या काळात खासगी चॅनेल देशात उदयास आले होते. ही माध्यम त्यांना नवीन संधी देईल हे समजण्यास मोदींना वेळ लागला नाही. डिबेटमध्ये सहभाग घेणे, पक्षाची बाजू ठामपणे मांडणे, त्यांनी हिंदुत्व किंवा पक्षाच्या धोरणांविषयी कोणताही गोंधळ केला नाही.
इंडिया टुडे टीव्हीचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांनी आपल्या ‘दि इलेक्शन टू इंडिया चेंज’ या पुस्तकात अनेक घटनांचा उल्लेख केला आहे, त्यातील एक म्हणजे मोदींनी त्यांना सांगितले की, मी डिबेटला येण्यास तयार आहे. पण त्यांच्याकडे कार नाही.
१९९५ मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. भारतीय जनता पक्षाने १८२ पैकी १२१ जागा जिंकल्या आणि दोन तृतीयांश बहुमत मिळवले. या निवडणुकीत प्रचार करणारे नरेंद्र मोदी यांनी निकालाच्या दिवशी सांगितले की हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे.
त्यानंतर केशुभाई पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री केले गेले. ते भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यावेळी मोदी चर्चेत नव्हते. मात्र, पक्षाच्या एका वर्गाने त्यांना सुपर मुख्यमंत्री समजण्यास सुरुवात केली. काही दिवसानंतर पक्षात मतभेद निर्माण होऊ लागले. पक्षाचे नेते शंकरसिंग बघेला यांनी बंड केले आणि केशुभाई पटेल यांना राजीनामा द्यावा लागला.
पक्षाने सुरेश मेहता यांना मुख्यमंत्री करण्यात आले. पक्षात फूट पाडत नरेंद्र मोदी पक्ष चालवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांच्यावर झाला. यानंतर हिमाचल आणि हरियाणाचा कार्यभार देत पक्षाने मोदींना गुजरातबाहेर पाठवले.
हे मोदींच्या हद्दपारीचे दिवस होते. त्याच्यासाठी एक नवीन आव्हान होते. ते आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडत होते, परंतु गुजरात त्यांच्या मनात होता. त्यांना कोणत्याही परिस्थितीत गुजरातचे मुख्यमंत्री व्हायचे होते. त्याकाळी खासगी टीव्ही चॅनेलच्या उदयाचे दिवस होते. डिबेट शो सुरु झाले. मोदींना राष्ट्रीय विषयांवर बोलायचे होते आणि टीव्हीला डिबेट शोसाठी हिंदी वक्त्यांची गरज होती. दोघेही एकमेकांची गरज बनले. त्यांनी प्राइम टाइममध्ये चॅनल्सवर राजकीय प्रवक्ते म्हणून येण्यास सुरुवात केली.
राजदीप सरदेसाई यांनी आपल्या पुस्तकात एका घटनेचा संदर्भ दिला आहे. रात्री १० वाजता लाईव्ह कार्यक्रम होणार होता. विजय मल्होत्रा हे भाजपाकडून शोसाठी येणार होते, परंतु ८.३० वाजता त्यांनी शोत सहभागी होण्यास नकार दिला. त्यांच्या जागी भाजपाकडून एका नेत्याची गरज होती. त्यावेळी राजदीप सरदेसाई यांनी नरेंद्र मोदींना फोन केला. मोदींनीही तात्काळ कार्यक्रमास येण्यास तयारी दर्शवली.
मी कार्यक्रमाला येण्यास तयार आहे, पण माझ्याकडे गाडी नाही असं मोदींनी राजदीप सरदेसाई यांना सांगितले. त्यावेळी मोदी भाजपा कार्यालयाशेजारी असलेल्या ९ अशोका रोडवर संघाच्या इतर प्रचारकांसमवेत राहत होते. मग राजदीप यांनी तुम्ही टॅक्सीने या, त्याचे पैसे देतो असं सांगितलं.
कार्यक्रमाची वेळ जवळ आली परंतु मोदी अद्याप कार्यालयात पोहचले नव्हते. जेव्हा कार्यक्रमाला फक्त ५ मिनिटे उरली होती. तेव्हा नरेंद्र मोदी स्टुडिओमध्ये शिरले आणि तेथून ओरडले की 'राजदीप मी आलोय. त्यांना ठाऊक होतं की त्यांना कोणाच्या जागी पर्याय म्हणून आणलं आहे. परंतु टीव्हीवर दिसण्याची संधी मोदींनी हाताने जाऊ दिली नाही.