शेती अत्याधुनिक करण्यासाठी आणि शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शरद जोशींनी प्रचंड कार्य केले असून आम्ही त्यांचं काम पुढे नेऊ - देवेंद्र फडणवीसगावोगावी लबाड भ्रष्ट आणि ढोंगी राजकारणी नेत्यांना गांवबंदी करविणारे शेतकरी संघटनेचे झुंझार मार्गदर्शक शरद जोशी यांचे १२ डिसेंबर रोजी वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाले.गेल्याच वर्षी शरद जोशींना मानाच्या प्रबोधनकार ठाकरे पुरस्काराने गौरवण्यात आले.१९७९ मध्ये शरद जोशींनी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि तेव्हापासून ’शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी कांदाउस तंबाखू दूध भात कापूस इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनाचे नेत्वृत्व केले.विकसनशील देशांतील आर्थिक दुरवस्थेचे अचूक निदान करून त्यावर उपचार सुचविणारा विचार म्हणून शरद जोशींचा विचार व त्याच्या मान्यतेसाठी त्यांनी सुरू केलेल्या शेतकरी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी अनेक विदेशी विद्यापीठांतील संशोधकांनी भारतात धाव घेतली. त्यांना शरद जोशींनी मार्गदर्शन केले.शेतकरी आंदोलन महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता त्यांनी देशभरात शेतकरी समन्वय समितीची स्थापना ३१ ऑक्टोंबर १९८२ रोजी केली आणि महाराष्ट्रासह पंजाब हरयाणा उत्तर प्रदेश मध्यप्रदेश बिहार गुजराथ राजस्थान कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्रप्रदेश इत्यादी राज्यात शेतकरी आंदोलने उभारली.