...तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते; "असं वाटतंय, की त्याच चपलेनं योगी आदित्यनाथांना मारावं" By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 08:11 PM 2021-08-24T20:11:02+5:30 2021-08-24T20:31:25+5:30
राणे यांना अटक झाल्यानंतर, उद्धव ठाकरे यांच्या एका जुन्या आणि आक्षेपार्ह वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. हे वक्तव्या त्यांनी योगी आदित्यनाथ यांना उद्देशून केले होते. ठाकरेंनी योगींना चपलेने मारण्याची भाषा केली होती. (Shiv Sena chief Uddhav Thackeray on Yogi Adityanath) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र पोलिसांनी ज्या वक्तव्यावरून अटक केली, त्याच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, एका रॅलीदरम्यान अगदी तशीच भाषा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी उघडपणे वापरली होती.
रायगड जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रेदरम्यान सोमवारी नारायण राणे म्हणाले होते, "मुख्यमंत्र्यांना (उद्धव ठाकरे) स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली हे माहीत नाही, हे लज्जास्पद आहे. भाषणादरम्यान ते मागे वळून याविषयी विचारताना दिसले. मी तिथे असतो तर त्याला एक जोरदार थापड दिली असती."
राणे यांना अटक झाल्यानंतर, उद्धव ठाकरे यांच्या एका जुन्या आणि आक्षेपार्ह वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. हे वक्तव्या त्यांनी योगी आदित्यनाथ यांना उद्देशून केले होते. ठाकरेंनी योगींना चपलेने मारण्याची भाषा केली होती.
उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य मे 2018 मध्ये महाराष्ट्रातील पालघर येथे एका निवडणूक प्रचारादरम्यान केले होते. यादरम्यान भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंधही बिघडलेले होते.
उद्धव ठाकरे म्हणाले होते, 'शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना योगी आदित्यनाथांनी खडाऊ (लाकडी पादुका) घातल्या होत्या. त्यांनी असे करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. हा योगी हवेच्या फुग्यांसारखा आहे. जो फक्त हवेतच उडत राहतो. आले आणि खडाऊ घालून थेट महाराजांकडे गेले. असे वाट आहे, की त्याच चपलेने त्यांना मारावे.'
ठाकरे यांच्या या वक्तव्यावर योगी आदित्यनाथांनीही प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, ‘माझ्याकडे त्याच्यापेक्षा अधिक शिष्टाचार आहे आणि मला श्रद्धांजली कशी अर्पण करावी हे माहित आहे. मला त्यांच्याकडून शिकायची गरज नाही.'
राणेंच्या या वक्तव्यावरून पेटले आहे राज्यातील राजकारण - स्वातंत्र्य दिनी मुख्यमंत्र्यांना देशाचा कितवा स्वातंत्र्य दिन आहे हे आठवत नाही. मी जर त्या ठिकाणी असतो तर कानाखाली खेचली असती, असे विधान नारायण राणे यांनी केले होते. त्यानंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेले विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारे आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती.
नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी राणेंच्या अटकेचे आदेश काढले होते.