मोदींनी आणली 'मेक इन इंडिया'; पण त्यांच्या घड्याळ, पेन, गॉगलचा ब्रँड 'आउट ऑफ इंडिया'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 01:28 PM2019-02-04T13:28:58+5:302019-02-04T13:42:57+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोवाडोचं घड्याळ वापरतात. स्वित्झर्लंडचा हा ब्रँड जगभरात प्रसिद्ध आहे. या ब्रँडच्या घड्याळ्याची किंमत 40 हजारांपासून सुरू होते आणि काही लाखांपर्यंत जाते. विशेष म्हणजे मोदी हे घड्याळ उलटं घालतात. तसं करणं ते लकी समजतात.

पंतप्रधान मोदी मों ब्लां कंपनीचं पेन वापरतात. हा जर्मनीचा ब्रँड आहे. मों ब्लां युरोपातील सर्वात उंच शिखर आहे. अमिताभ बच्चन, बराक ओबामा, दलाई लामा, वॉरेन बफे यांच्यासारखे दिग्गज या ब्रँडचं पेन वापरतात. मोदी जे पेन वापरतात, त्याची किंमत 1 लाख 30 हजार इतकी आहे.

मोदी बुल्गरी ब्रँडचे सनग्लासेस वापरतात. या ब्रँड इटलीचा आहे. बुल्गरी हा दागिन्यांच्या क्षेत्रातला प्रख्यात ब्रँड आहे. आता हा ब्रँड घड्याळं, परफ्यूम, सनग्लासेसचीही निर्मिती करतो. बुल्गरीच्या सनग्लासेसची किंमत 15 हजारांपासून सुरू होते.

टेक सॅव्ही असलेले मोदी आयफोन वापरतात. या फोटोत मोदींकडे जो मोबाईल आहे, तो आयफोन6 एस आहे. हा फोटो काही महिन्यांपूर्वीचा आहे. या कालावधीत मोदींनी त्यांचा मोबाईल बदलला असल्याची शक्यता नाकारात येत नाही.

आता मोदी कोणतं सिम कार्ड वापरतात तेही जाणून घ्या. मोदी व्होडाफोनचं सिम वापरतात. दीड वर्षांपूर्वी त्यांच्याकडे 4जी सिम नव्हतं. मोदींनी त्यावेळी एक स्क्रिनशॉट शेअर केला होता. त्यात व्होडाफोन इन 3जी असं स्क्रीनच्या टॉपला दिसून येत आहे.