नागपुरातील वाडी नगरपरिषदेच्या एकूण २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १० जागा मिळाल्या आहेत तर ७ जागा मिळवित बसपाने मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीला ०४ जागा शिवसेनेला ०२ जागा काँग्रेसला ०१ तर एका अपक्षाला विजय मिळविण्यात यश आले आहे.जळगावमधील वरणगाव नगरपालिकेतील १८ जागासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप ८ जागा मिळवित सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीला ०५ जागा तर शिवसेनेला ०१ आणि अपक्षाला ०४ जागेवर विजय मिळविता आला आहे.पुण्यातील राजगुरूनगर नगरपरिषदेच्या १६ जागासाठी झालेल्या निवडणुकीत सत्तेच्या चाव्या अपक्षाच्या हाती लागल्या आहेत. सर्वाधिक ०९ जागेवर अपक्ष विजयी झाले असून भाजपाला ०७ जागा मिळाल्या आहेत.कुळगाव-बदलापुरातील ४७ जागापैकी शिवसेनेला सर्वाधिक २४ जागा मिळाल्या आहेत. भाजपाला २० जागा राष्ट्रवादीला ०२ जागा तर एका अपक्षाला विजय मिळविता आला आहे.अंबरनाथमधील ५७ जागांपैकी शिवसेनेला २६ जागा भाजपाला १० जागा काँग्रेसला ०८ जागा राष्ट्रवादीला ०५ जागा मनसेला ०२ जागा तर अपक्षाला ६ जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी २९ जागा आवश्यक असल्याने अंबरनाथ नगर परीषदेवर भगवा झेंडा फडकणार हे निश्चित आहे.नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकासोबतच भोकर नगर परीषदेची निवडणूक पार पडली. भोकर हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असल्यानं त्याकडं लक्ष लागलं होतं. बालेकिल्ला राखण्यात अशोक चव्हाण यांना यश आलं आहे. १९ जागा असलेल्या भोकर नगर परीषदेत काँग्रेसला १२ जागा राष्ट्रवादीला ०३ भाजपाला ०२ तर अपक्षाला २ जागा मिळाल्या. १२ जागा मिळाल्यानंतरही आपण समाधानी नसल्याचं चव्हाण यांनी म्हटंलं आहे.औरंगाबादमध्ये अनेक वर्षापासून असलेली सत्ता शिवसेनेने कायम राखण्यात यश मिळवले. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या मैदानात पहिल्यांदाच उतरलेल्या "एमआयएम"ने २५ जागेवर विजय मिळवित जोरदार मुसंडी मारली. तर बसलाला ५ जागा मिळविण्यात यश आले. शिवसेना ३५ एमआयएम २५ भाजप २३ काँग्रेस १० आरपीआय डेमोक्रॅटिक १ तर इतर १२ जागेवर विजयी झाले आहेत.नवी मुंबईतील १११ जागेसाठी झालेल्या महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी ठरला. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी आपला बालेकिल्ला राखण्यात यश मिळवले असले तरी सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला काँग्रेसची तसेच अपक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला ५३ जागा शिवसेनेला ३७ जागा काँग्रेसला १० जागा भाजपला ०६ जागा तर अपक्षाला ५ जागांवर विजय मिळविता आला आहे.