will expose scam of shiv sena leader in 2 days says bjp leader kirit somaiya
राठोड यांच्यानंतर शिवसेनेचा आणखी एक नेता अडचणीत?; भाजपच्या बड्या नेत्याच्या ट्विटनं खळबळ By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 04:57 PM2021-03-01T16:57:09+5:302021-03-01T17:01:19+5:30Join usJoin usNext पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अडचणीत आल्यानं वनमंत्री संजय राठोड यांनी काल राजीनामा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारला. यानंतर आता शिवसेनेचा आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात भाजप नेते प्रताप सरनाईक यांनी मोहीम उघडली. आता ती अधिक तीव्र करण्याचा सोमय्या यांचा मानस दिसत आहे. आज सोमय्या पुन्हा ईडी कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या प्रकरणातील महत्वाची माहिती ईडी अधिकाऱ्यांना दिल्याचं समजतं. पुढील २ दिवसांत शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणार असल्याचं सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'संजय राठोड आऊट. पुढील २ दिवसांत शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा पुराव्यांसह समोर आणणार,' असं सोमय्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. किरीट सोमय्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. संजय राठोड यांच्यानंतर कोणाचा नंबर लागणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सोमय्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये शिवसेना नेत्याच्या नावाबद्दल कोणतेही संकेत दिलेले नाहीत. हा नेता नेमका कोणत्या भागातला आहे, याबद्दलही सोमय्यांनी काही नमूद केलेलं नाही. सोमय्या यांनी त्यांच्या ट्विटमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना टॅग केलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणामुळे संजय राठोड अडचणीत आले. विधिमंडळ अधिवेशनात यावरून विरोधक आक्रमक होऊ नये यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी राठोडांचा राजीनामा घेतला. यानंतर आता शिवसेनेचा कोणता नेता अडचणीत येणार, याची जोरदार चर्चा विधिमंडळात पाहायला मिळत आहे.टॅग्स :संजय राठोडपूजा चव्हाणउद्धव ठाकरेशिवसेनाकिरीट सोमय्याप्रताप सरनाईकSanjay RathodPooja ChavanUddhav ThackerayShiv SenaKirit Somaiyapratap sarnaik