Chandrakant Patil: चंद्रकांत पाटलांची नानांसोबत 'समाधान'कारक भेट, मोदीमगही दिला भेट By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 04:43 PM 2022-01-11T16:43:35+5:30 2022-01-11T17:01:58+5:30
Chandrakant Patil: बॉलिवूडचा डॅगिंश अभिनेता आणि मराठमोळा कलाकार नाना पाटेकर यांचे देशभरात चाहते आहेत. तिरंगा, क्रांतीवर, अब तक 56 यांसारख्या चित्रपटांतून नानाने आपल्या भूमिकेचा ठसा समाजमनावर कोरला आहे. बॉलिवूडचा डॅगिंश अभिनेता आणि मराठमोळा कलाकार नाना पाटेकर यांचे देशभरात चाहते आहेत. तिरंगा, क्रांतीवर, अब तक 56 यांसारख्या चित्रपटांतून नानाने आपल्या भूमिकेचा ठसा समाजमनावर कोरला आहे.
मुंबईच्या 26/11 हल्ल्यावर बनविण्यात आलेल्या चित्रपटातही नाना पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेतून आपल्या कामाची ओळख करून दिलीय. तर, अलिकडेच आलेल्या वेलकम चित्रपटातूनही जबरदस्त कॉमेडी केलीय.
नाना पाटेकरला परिंदा, क्रांतीवीर या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही नानांचा वेगळाच दबदबा आहे.
नाना पाटकरचे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसी मैत्रीचे संबध आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशीही नानाचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तर, कोकणचे नेते नारायण राणे, सुनील तटकरे हे नानांचे मित्र आहेत.
नाना कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्नित नाही, तसेच राजकारण प्रवेश करण्याचा कुठलाही मानस नाही, असेही नानाने यापूर्वीच सांगितले होते.
नानाला सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी व्हायला आवडते. म्हणून अभिनेता मकरंद अनासपुरेसोबत नानाने नाम फाऊंडेशन नावाने शेतकऱ्यांना मदत करणारी संस्था उभारली.
आता, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाना पाटेकर यांची त्यांच्या पुण्यातील घरी जाऊन भेट घेतली. या भेटीत पाटील यांनी नानां एक पुस्तक आणि मोदींचं चित्र असलेला मगही भेट दिलाय.
पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये, नानांची कडकडून गळाभेट घेतल्याचे दिसून येते.
यावेळी समाधान या माझ्या कॉफीटेबल बुकची प्रत भेट दिली. तसेच, अनेक विषयांवर अनौपचारिक गप्पा झाल्याचेही पाटील यांनी सांगितले.