Photos: पुण्यात महिलांकडून विधिपूर्वक "छठ पूजा"; सूर्य देवाला नैवैद्य अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 16:31 IST2021-11-11T16:24:38+5:302021-11-11T16:31:09+5:30

पुण्याच्या वाघोलीतील भैरवनाथ मंदिर येथे "छठ पूजा" करण्यासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रंगबेरंगी वस्त्र धारण करत महिलांकडून विधिपूर्वक छठ पूजा करण्यात आली. महिलांनी सूर्योदय वेळी पाण्यात उभे राहून सूर्य देवाला नैवैद्य अर्पण केले. या पूजेत पुरुषांनी सुद्धा सहभाग घेतला होता. (सर्व छायाचित्रे :- सुशील राठोड)