Photos: राज्यासहित पुण्यातही चित्रपटगृहे सुरु; पण प्रतिसाद मात्र १० टक्केचं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 19:34 IST2021-10-22T19:31:42+5:302021-10-22T19:34:33+5:30
राज्यासहित पुण्यातही आजपासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु झाली आहेत. परंतु शहरातील बऱ्याच सिनेमागृहात १० टक्के प्रतिसाद असल्याचे दिसून आले आहे. शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने लोक ३० ते ३५ टक्के प्रतिसाद मिळेल असे सिनेमागृह मालकांनी सांगितले आहे. तसेच रविवारी मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये भारत - पाकिस्तान सामना होणार असल्याने गर्दी होण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले आहेत. (सर्व छायाचित्रे :- तन्मय ठोंबरे)