Corona Vaccine News : प्रतीक्षा संपली ! सिरमच्या 'कोविशिल्ड' लसची 'विजयी' घौडदौड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 07:22 IST2021-01-12T06:17:25+5:302021-01-12T07:22:27+5:30

कोरोना महामारीवर उपयुक्त ठरणाऱ्या या बहूप्रतिक्षित लसीची जगभरातील नागरिक मोठ्या आतुरतेने वाट पहात होते. अखेर आवश्यक ते सर्व सरकारी सोपस्कार पार पाडत ʻसिरमʼ कंपनीने ही लस देशांतर्गत नागरिकांना वापरासाठी आजपासून उपलब्ध करून दिली...

सिरमची 'कोविशिल्ड' लस घेऊन जाणारे कंटेनर बाहेर येण्याच्या प्रतीक्षेत..( सर्व छायाचित्रे : तन्मय ठोंबरे )

कोरोनाच्या प्रतिकारासाठी सिरम इन्स्टिटयूटने तयार केलेल्या ʻकोविशिल्डʼ या लसीच्या सुरक्षिततेसाठी मोठा बंदोबस्त

कंपनीला सुरवातीला २ कोटी डोसची ऑर्डर मिळाली आहे. त्यापैकी ६५ लाख डोस आज देशभरातील विविध राज्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले.

देशातंर्गत कोरोना लसीच्या वितरणासाठी सिरमचे कंटेनर सज्ज

कोरोना वॉरियर्ससाठी या लसीचा वापर हा प्रामुख्याने करण्यात येणार

कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वाहतूक करणाऱ्या कंटेनरची पूजा

'कोल्ड चेन व्हॅन' लोहगाव विमानतळाकडे रवाना; ही लस २ ते ८अंश सेल्सियस इतक्या तापमानात ठेवणे आवश्यक असल्याने या व्हॅनमधून तितके तापमान नियंत्रित करण्यात आले आहे.

कोविशील्ड च्या मांजरी ते लोहगाव मार्गावर ठिकठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात

लोहगाव विमानतळावरून लगेचच देशातील विविध राज्यांमध्ये विमानांद्वारे या लसीची वाहतुक करण्यात येणार