corona virus : पुण्यात शुकशुकाट, बघा मुख्य रस्त्यांवरील चित्र ! By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 09:23 PM 2020-03-19T21:23:33+5:30 2020-03-19T21:40:20+5:30
कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे वर्दळीचे वाटणारे रस्ते निवांत दिसून आले. कायम वाहतुकीची वर्दळ आणि नागरिकांचा गजबजाट अनुभणारा हा भाग वेगळाच भासत होता. बघा या ठिकाणांची क्षणचित्रे. नेहमी गजबजणाऱ्या लक्ष्मी रस्त्यावरील सर्व दुकाने बंद होती. रोज ग्राहकांची वर्दळ अनुभवणारा हा रस्ता शांत झाला होता.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील दृश्य
विद्यार्थ्यांनी भरून जाणारा आप्पा बळवंत चौकात निरव शांतता बघायला मिळाली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरही भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे.
पुण्याचे ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपतीचे मंदिर बंद करण्यात आले आहे.
भाविकांचे श्रद्धास्थान आणि पर्यटकांचा आकर्षण बिंदू असणारी सारसबाग बंद होती.
महापालिकेच्या प्रवेशद्वारावर गरज असेलच तर नागरिकांना प्रवेश दिला जात आहे. अन्यथा तिथेच त्यांचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाहतुक पोलिसही मास्क बांधून काम करत आहे. अगदी दंड आकारतानाही ते मास्क घालायला विसरत नाहीत.
शहरातील सर्व पान टपऱ्या बंद असून त्यातूनही कोरोना विषाणू पसरू नये असाप्रयत्न आहे.
चित्रपटगृहेही बंद असून तिथला बंद पडदा जणू प्रेक्षकांची वाट बघतो आहे. (सर्व छायाचित्र :तन्मय ठोंबरे)