पोलीस FIR आणि NC मधील फरक, जाणून घ्या काय? By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 01:15 PM 2021-12-01T13:15:45+5:30 2021-12-01T13:34:16+5:30
एखादा गुन्हा पोलिसात नोंदवायचा म्हणजे #FIR ही एकमेव तरतूद आहे असं आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं, पण खरंतर गुन्हे दोन प्रकारचे असतात. एखादा गुन्हा घडल्यास किंवा भांडण तंटा झाल्यास पोलीस डायरीत नोंद करण्यात येत असते.
पोलिसांकडे तक्रार देण्यास आलेल्या नागरिकांचे पोलीस डायरीत नोंद करुन गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यावेळी, एफआयआर आणि एनसी या दोन स्वरुपात हा गुन्हा नोंद केला जातो.
एखादा गुन्हा पोलिसात नोंदवायचा म्हणजे #FIR ही एकमेव तरतूद आहे असं आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं, पण खरंतर गुन्हे दोन प्रकारचे असतात.
1. कॉग्निजेबल - एफआयआर नोंदवणे 2. नॉन - कॉग्निजेबल (एनसी) - रजिस्टर मध्ये नोंद करणे (अदखलपात्र गुन्हा)
हत्या, हत्येचा प्रयत्न, धोकायदायक शस्त्राने जखम झाल्यास, डाका दरोडा आणि चोरी यांसारखे गुन्हा एफआयआर म्हणून नोंद केले जातात.
भांडण, धक्काबुक्की आणि बाचाबाची होताना किरकोळ जखम झाल्यास तीन एनसी म्हणजे नॉन कॉग्निजेबल (अदखलपात्र) गुन्हा म्हणून नोंद करण्यात येते.
या भांडणात टाके पडल्या, खोलवर जखम झाल्यास किंवा हाडे तुटल्यास तो एफआयआर म्हणून गुन्हा नोंद होतो.
एखाद्या पुरुषाने स्त्रीविरुद्ध कुठलाही गुन्हा केल्यास किंवा अल्पवयीनविरुद्ध गुन्हा घडल्यास तो एफआयआर म्हणून नोंद केला जातो. हुंड्यावरुन झालेलं भांडण एफआयआर असते.
कौटुंबिक सदस्यांमध्ये हिंसा न होता, वादविवाद-भांडण झाल्यास तो एनसी म्हणून गुन्हा नोंद होतो. गंभीर दुखापत न होता शेजाऱ्याशी झालेलं भांडणही एनसी असते.
दरम्यान, मालमत्ताविषयक वाद हा पोलीस हिंसक न झाल्यास पोलीस ठाण्याच्या अखत्यारित येत नाही. मात्र, या वादातून हिंसा झाल्यास एफआयआर दाखल होतो.