पाणीच पाणी चहूकडे : पुण्यात पावसाने उडवली दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 21:37 IST2018-07-16T21:13:48+5:302018-07-16T21:37:55+5:30

गेले तीन दिवस पुणे शहर आणि धरण क्षेत्रात सुरु असलेल्या पावसाने सोमवारी शहरात दाणादाण उडवली आहे.

कोंढवे धावडे येथील काही दुकानात पाणी गेले होते. यामुळे नुकसान टाळण्यासाठी दुकानदार प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते.

दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे संध्याकाळी सर्वत्र वाहतूक कोंडी झाली होती.

साचलेले पाणी आणि रस्त्यातील खड्ड्यांनी पाण्याचे कारंजेही उडवले.

बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आणि नदीपात्रातील वाहतूक डेक्कनमार्गे वळवण्यात आली.