G20 Summit Pune | पुण्यात परदेशी पाहुण्यांचा 'हेरिटेज वॉक'; पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 10:29 AM 2023-01-18T10:29:24+5:30 2023-01-18T10:37:20+5:30
जी २० परिषदेसाठी आलेले परदेशी पाहुण्यांनी बुधवारी (दि. १८) सकाळी ७ वाजता शनिवार वाडा, लाल महाल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, नाना वाडा या ठिकाणी हेरिटेज वॉक केला. (छायाचित्र- आशिष काळे) यामध्ये दक्षिण आफ्रिका, कॅनडा, मेक्सिको, ब्राझील, चीन, जपान, दक्षिण कोरिया, भारत, इंडोनेशिया, रशिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आदींसह विविध देशांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
हेरिटेज वॉक दरम्यान गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
या सर्व परदेशी पाहुण्यांना सकाळी ७ ते ८.३० या वेळेत हेरिटेज वॉक घडविला
यावेळी गाइडच्या माध्यमातून त्यांना ऐतिहासिक स्थळाची माहिती देण्यात आली
सर्व पाहुण्यांना संबंधित वास्तूची माहिती देण्यात आली.
मोठ्या उत्साहात परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले
पाहुण्यांनी लाल महालाला भेट दिली
परदेशी पाहुण्यांना माहिती देताना गाईड