Hailing from the torrential rains in Pune, hundreds of cars flowed into the river
पुण्यात मुसळधार पावसाचा हाहाकार, शेकडो गाड्या ओढ्यात गेल्या वाहून By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 08:17 AM2019-09-26T08:17:59+5:302019-09-26T08:25:14+5:30Join usJoin usNext पुण्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. पुण्यातील आंबील ओढ्याचे पाणी बाहेर आल्यानं दक्षिण पुण्यात मध्यरात्री पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पुरात अनेक कच्ची घरे कोसळली असून, रस्त्यांवर पाणीच पाणी साचलेलं पाहायला मिळतंय. पुराच्या पाण्यामुळे शेकडो गाड्या ओढ्यात वाहून गेल्या असून, यामध्ये चारचाकी, दुचाकी गाड्याचा समावेश आहे. अरण्येश्वर भागात वाहणाऱ्या आंबिल ओढ्याला कात्रज परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढलं. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पुरासारखी स्थिती होती. सतत कोसळत असलेला पाऊस आणि ओढ्याचा पूर यामुळे आसपासच्या वस्त्यांत पाणी घुसले. पाण्याच्या दाबामुळे घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. टॅग्स :पूरflood