Chandni Chowk Bridge Demolished: भूईसपाट! चांदणी चौकातील पूल अखेर इतिहासजमा; अवघ्या पाच सेकंदात धडाम, पाहा, PHOTO By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 07:35 AM 2022-10-02T07:35:56+5:30 2022-10-02T07:44:24+5:30
Chandni Chowk Bridge Demolished: पुण्याच्या चांदणी चौकातील पुलाचा सुरक्षाकठडा ब्लास्टिंगनंतरही पडला नाही. त्यामुळे हा प्रयोग फसल्याची चर्चा होती. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी पडण्यात आला. अवघ्या पाच सेकंदात हा पूल जमीनदोस्त झाला. ६०० किलो स्फोटकांच्या माध्यमातून हा पूल पाडण्यात आला. (फोटो क्रेडिट- आशिष काळे)
सायंकाळी सात पासूनच पुलाच्या २०० मीटर परिसर निर्मनुष्य करण्यास सुरवात करण्यात आली होती. सायंकाळनंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला होता. (Chandni Chowk Bridge Demolished Photos)
चांदणी चौकातील हा पूल पाडण्यासाठी कंट्रोल्ड ब्लास्ट पद्धतीचा वापर करण्यात आला. हा ब्लास्ट करताना लोखंडी जाळीच्या आठ लेअर लावण्यात आलेल्या होत्या. जिओ पद्धतीच्या पांढऱ्या कापडाचा धूळ न उडण्यासाठी वापर करण्यात आला होता.
सुमारे ३० वर्षांपूर्वीचा हा पूल इतिहासजमा झाला. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. ज्या कंपनीने नोएडामधील ट्विट टॉवर जमीनदोस्त केले, त्याच इडिफीस कंपनीला हा पूल पाडण्याचे काम देण्यात आले. आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनासाठी हा पूल पाडण्याचे काम करण्यात आले.
हा पूल पाडण्यासाठी सुमारे ६०० किलोची स्फोटके तसेच १ हजार ३५० डिटोनेटर्सचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या पूलाचा पाडकामासाठी ३०० पोलीस, अग्निशमन दलाची २ वाहने, तसेच ३ रुग्णावाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.
चांदणी पूलातून जाणारी वाहतूक रविवार सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असेल, अशी माहिती देण्यात आली आहे. या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या ठिकाणी जमा झालेला मलबा दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले. या ब्लास्ट दरम्यान संपूर्ण पूल मात्र जमीनदोस्त झाला नाही. उर्वरित स्ट्रक्चर जेसीबीच्या सहाय्याने पाडण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
अपेक्षित व ठरल्याप्रमाणे स्फोट यशस्वी झाला. मात्र, पुलाचे बांधकाम करताना मोठ्या प्रमाणात स्टील व दगड वापरण्यात आले होते. त्यामुळे स्फोटानंतर पूल कमकुवत झाला. पण पिलर पडले नाहीत. एनडीएच्या बाजूचे काही होल मिस झाल्याची शंका आहे, अशी प्रतिक्रिया आनंद शर्मा यांनी दिली.
पुलाचा सुरक्षाकठडा ब्लास्टिंगनंतरही पडला नाही. त्यामुळे हा प्रयोग फसल्याची चर्चा होती.