Jai Ho ... Corona vaccine's dry run successful in Maharashtra, Rajesh tope
जय हो... महाराष्ट्रात कोरोना लसीचं ड्राय रन यशस्वी By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 10:33 PM2021-01-02T22:33:42+5:302021-01-02T22:42:34+5:30Join usJoin usNext कोरोना लसीकरणासाठी आज राज्यातील पुणे, नागपूर, जालना आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांमध्ये ड्राय रन यशस्वीरित्या घेण्यात आला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जालना येथे ड्राय रनच्या सत्राचे उद्घाटन करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरणाचे ड्राय रन घेण्यात आले. राज्यस्तरावरुन या ड्राय रनचे संनियंत्रण आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ अर्चना पाटील यांनी केले. पुणे जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र माण, पिंपरी चिंचवड महापालिकेतील जिजामाता आरोग्य केंद्र येथे लसीकरण झाले. नंदूरबार जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी आणि उपजिल्हा रुग्णालय नवापूर तर जालना जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अंबड, प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगाव येथे लसीकरण झाले. नागपूर जिल्ह्यात डागा मेमोरियल हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय कामठी आणि नागपूर महापालिकेतील के.टी.नगरचे शहरी आरोग्य केंद्र याठिकाणी ड्राय रन घेण्यात आला. या चारही जिल्ह्यांमध्ये व महानगरपालिकेत सत्र स्थळी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व मनपा आरोग्य अधिकारी यांनी भेटी देऊन संनियंत्रण केले. या ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करणे. २५ लाभार्थ्यांचे लसीकरण करणे याकामांसोबतच लसीकरण अधिकारी एक यांनी लाभार्थ्यांना त्यांच्या कोवीन अॅपवरील नोंदणीनुसार कक्षात सोडले त्यानंतर लसीकरण अधिकारी दोन यांनी कोवीन अॅप्लीकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केली. त्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोवीन ॲपमध्ये करण्यात आली. गर्दीचे व्यवस्थापन, लाभार्थ्यांशी वैयक्तिक संवाद साधणे, आरोग्य सेविकेला मदत करणे, लसीकरण झाल्यानंतर ३० मिनिटे लाभार्थ्यांना थांबण्यास सांगणे इ. गोष्टी लसीकरण अधिकारी तीन व चार यांनी केले. कोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझरची उपलब्धता करण्यात आली. सर्वांनी मास्क वापरणे आणि योग्य ते अंतर (Social Distancing) राखणे या नियमांची अंमजबजावणी करण्यात आली. सर्व सत्रांच्या ठिकाणी लसीचे दुष्परिणामांवरील उपचाराचे औषधाचे साहित्य ठेवण्यात आली होती. प्राथमिक स्तरावर घेण्यात आलेल्या ड्राय रन चाचणीच्या यशस्वीतेमुळे लवकरच लसीकरण मोहिम सुरू होईल, असे दिसून येत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने आज देशातील प्रत्येक नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. टॅग्स :राजेश टोपेकोरोना वायरस बातम्यामुंबईRajesh Topecorona virusMumbai