बघा मनसेचे पुण्यातले अनोखे गाजर हलवा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 21:31 IST2018-03-16T21:31:21+5:302018-03-16T21:31:21+5:30

भाजपच्या पुणे शहरातील वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने 'गाजर हलवा' वाटून महापालिकेत आंदोलन करण्यात आले. मनसेच्या या हटके आंदोलनाची चर्चा महापालिका भवनात रंगली होती.

महापालिकेत कामासाठी आलेले नागरिकही गाजर हलवा बघितल्यावर थांबून खात पुढे जात होते.

अबाल-वृद्ध अशा सर्वांना या आंदोलनाच्या निमित्ताने गाजर हलव्याची चव चाखता आली. येणाऱ्या -जाणाऱ्यांना मनसेचे कार्यकर्ते आग्रहाने हलवा देत होते.

मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासदांनी चवीने गाजर हलव्याचा आस्वाद घेतला.

यावेळी अधिकाऱ्यांनाही मनसेचेच्या पदाधिकाऱ्यांनी आग्रहाने गाजर हलवा खाऊ घातला.