माझी 'माई'.... आजीच्या शतकाचं नातीकडून सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 14:47 IST2019-12-02T14:35:41+5:302019-12-02T14:47:38+5:30

जिथे मी लहानाची मोठी झाले, त्या गावात आणि त्या विठ्ठल मंदिरात माझी शंभरी व्हावी" ही इच्छा माई आजीने व्यक्त केली - मेघ घोलप (नातू)
मग काय लागले पुणेकर, मुंबईकर, नाशिककर आणि कर्जतकर कामाला, शंभरीचा कार्यक्रम अविस्मरणीय बनवायला.
दहीवली गावात हा छोटेखानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले, वेळ दिला, इंनपुट्स दिली, मदत केली त्या सर्वांचेच मनःपूर्वक ऋणी आहोत
माई, आजींचं नाव शांताबाई रामचंद्र घोलप. आता सध्या त्या कोथरूड पुणे येथे राहतात. त्यांना एकूण 5 मुलगे आणि एक मुलगी आणि आठ नातवंडे आहेत.
आजींचे वडील हे त्याकाळी क्वालिफिटरी जनरल (बॅरिस्टर सारख्या मोठ्या हुद्द्यावर) होते. आजींचं बालपण दहिवली कर्जत येथे गेले.