old Wada and Shiva temple in the dam
धरणात दडलेला वाडा आणि शिवमंदिर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 03:46 PM2018-05-31T15:46:27+5:302018-05-31T15:48:16+5:30Join usJoin usNext पुण्यातील वरसगाव धरणात वर्षभर पाण्यात असणारे शिवमंदिर यंदा दिसून आले आहे. धरण कोरडे झाल्याने मंदिर बघायला मिळत आहे. या मंदिरात शंकराची पिंड नसली तरी मंदिराचा बराचसा भाग सुस्थितीत आहे. या मंदिराच्या बाजूला शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सहकारी मानण्यात येणाऱ्या वीर बाजी पासलकर यांचा वाडा आहे.मात्र वाड्याचा बराचसा भाग वाहून गेला असून फक्त दगडी चौकटी शिल्लक आहेत. हे मंदिर आणि वाडा धरण बांधताना तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने जतन करता आले नाही. उन्हाळ्यात शिवमंदिर, बाजूचे कालभैरव मंदिर बघायला इतिहासप्रेमी गर्दी करत असतात. टॅग्स :पुणेनदीइतिहासPuneriverhistory