Photos: पुण्यात दिवाळीच्या वस्तूंनी बाजारपेठ फुलली; खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 00:29 IST2021-10-24T20:32:56+5:302021-10-25T00:29:04+5:30
दिवाळी अवघ्या एक आठवड्यावर येऊन ठेपली आहे. रंगबेरंगी कंदील, पणत्या, मातीचे रेडिमेड किल्ले, लक्ष्मीची मूर्ती, कपडे, अशा गोष्टींनी बाजारपेठ फुलून गेली आहे. शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडल्याचे आज दिसून आले आहे. पुण्यात कोरोनाचा संसर्गही कमी होऊ लागला आहे. अनेकांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. नागरिक खबरदारी घेऊन खरेदी करताना दिसून आले आहेत. (सर्व छायचित्रे :- तन्मय ठोंबरे)