PHOTOS: पुण्यात १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 15:06 IST2022-01-03T14:54:59+5:302022-01-03T15:06:47+5:30

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरु करण्यास परवानगी दिली. देशभरात सकाळपासून लसीकरण केंद्रावर गर्दी झाली आहे. पुण्यातही महापालिकेच्या ४० दवाखान्यांमध्ये लसीकरण सुरु झाले आहे. महापालिका हद्दीत १५ ते १८ वयोगटातील लसीकरणासाठी पात्र मुलांची संख्या २ लाख २ हजार १०८ इतकी आहे. केंद्राच्या निर्देषानुसार शहरातील एकूण लोकसंख्येच्या ४.८ टक्के संख्या या लसीकरणासाठी पात्र धरण्यात आली आहे. (सर्व फोटो- तन्मय ठोंबरे)