Photos: पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) १४१ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा दिमाखात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 14:50 IST2021-10-29T14:45:25+5:302021-10-29T14:50:41+5:30
पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) १४१ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. ''कदम कदम बाढाये जा'', या बँडच्या धूनवर दिमाखदार संचलनाला सुरूवात झाली. संचलनाला चेतक हेलिकॉप्टरने सलामी दिली. तालबद्ध संचलन सुरू असताना सुपर दिमोना या विमानांनी हजेरी लावली. प्रबोधिनीचे माजी छात्र असलेले जनरल नरवणे यांनी संचलानाची पाहणी केली. यानंतर १४१ व्या तुकडीचे छात्र अंतिम पथा कडे तालबद्ध पाऊल टाकत मार्गस्थ झाले. अंतिम पथाचा टप्पा पार केल्यानंतर छात्रांनी एकच जल्लोष केला आणि या जल्लोषात जग्वार आणि सुखोई या लढाऊ विमानांना सलामी दिली. (सर्व छायाचित्रे :- तन्मय ठोंबरे)