- श्रीकिशन काळे ( फोटो- आशिष काळे) पुणे-नगर रस्त्यावर शिरूरजवळ घोडनदीकाठी एक भूशास्त्रीय नवलस्थान आहे. त्याला रांजणखळगे म्हटले जाते. पुण्यात अशी चांद्रभूमी असेल असं वाटत नाही. परंतु, अगदी शिवणे व नांदेड सिटीच्या मधोमध मुठा नदीवर पूल आहे. त्या ठिकाणी रांजणखळगे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता पुण्यातून निघोज या ठिकाणी ते पाहण्यासाठी जाण्याची गरज नाही. हा निसर्गाविष्कार जतन करणे आवश्यक आहे. पण पुणे शहरातील रांजणखळगे कचऱ्यांनी भरली आहेत. लोकांच्या अज्ञानामुळे या रांजणखळग्यांची दुरवस्था झाली आहे.