पुण्यात एनडीएच्या १३३व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 20:27 IST2017-11-30T20:22:08+5:302017-11-30T20:27:00+5:30

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत १३३ व्या तुकडीच्या तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर झालेल्या संचलनानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) तीन वर्षांतील शिस्तबद्ध प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी पूर्ण केले. १३३ व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळा गुरूवारी उत्साहात पार पडला. संचलनानंतर अंतिम पथ पार करत विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. तसेच कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असाच उत्साही भाव विद्यार्थ्यांच्या चेहºयावर ओसंडून वाहत होता.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत १३३ व्या तुकडीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना अभिनेते नाना पाटेकर.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत १३३ व्या तुकडीच्या तीन वर्षांच्या प्रशिक्षणात केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल कॅडेट कॅप्टन अर्जुन ठाकुर याला राष्ट्रपती सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले. बटालीयन कॅडेट कॅप्टन शशांक शेखर याला कांस्य पदक, तर डीव्हीजनल कॅडेट कॅप्टन राहूल बिष्ट याला रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले.