वनाझ ते रामवाडी मार्गाच्या मेट्रोचे काम सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 11:00 IST2018-05-16T11:00:05+5:302018-05-16T11:00:05+5:30

'आली आपली मेट्रो' या टॅगलाईनसह पुणे मेट्रोची वाट पुणेकर बघत आहेत. त्यातच वनाज ते रामवाडी या मार्गावरचे मेट्रो उभारणीचे काम वेगाने सुरु झाले आहे.
वनाज ते नगर रस्त्यावरील रामवाडीपर्यंत धावणारी ही उन्नत अर्थात एलिव्हेटेड मार्गिका ही १४.६६ किमी लांबीची पूर्णपणे एलिव्हेटेड मार्गिका असेल.
हे काम सुसाट वेगाने सुरु असून पुणेकर येता-जाता थांबून काम न्याहाळत आहेत.
ही मार्गिका शिवाजीनगर येथे बांधण्यात येणार्या सिव्हिल कोर्ट स्थानकावर मार्गिका १ व ३ शी जोडली जाईल.
सध्या आयडीयल कॉलनी, गरवारे कॉलेजसमोर कर्वे रस्ता आणि नदीपात्र रस्त्यात मेट्रोचे काम सुरु आहे.