पुण्यात गेल्या आठवड्यापासून संततधार पावसाला सुरुवात झाली होती. आता दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे भरू लागली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने खडकवासला धरणातून विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्याने मोठ्या प्रमणावर पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या वस्तीतील घरात पाणी शिरल्याचे दिसून आले आहे. एरंडवणा भागातील राजपूत वीटभट्टी वसाहतीत आज सकाळी पाणी शिरले. घराघरात पाणी शिरल्याने नागरिकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. (सर्व छायाचित्रे - आशिष काळे)