Fashion Street Market Fire: पुण्याच्या फॅशन स्ट्रीटच्या धगधगत्या ज्वाळा; पहा कॅम्पमधील अग्नितांडवाचे भयावह फोटो... By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 08:12 AM 2021-03-27T08:12:20+5:30 2021-03-27T08:36:59+5:30
Pune Fashion Street Market Fire: अत्यंत तोकड्या जागेत असलेले हे मार्केट अनेक पुणेकरांचे आकर्षण राहिलं आहे. या आगीत व्यापाऱ्यांचे लाखोंचे रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षांपासुन हे मार्केट इथून हलवण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे आग नेमकी लागली कशी याची चौकशी करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. पुण्यातल्या कॅम्प परिसरातल्या फॅशन स्ट्रीटला रात्री ११ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, अनेक दुकाने जळून खाक झाली.
अग्निशमन दलाचे १५ बंब घटनास्थळी पोहचले असताना गर्दीमुळे आग विझवण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या, साधारण २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं.
कॅम्प परिसरातलीच आगीची पंधरा दिवसातली ही दुसरी घटना आहे. काहीच दिवसांपूर्वी शिवाजी मार्केटमध्ये देखील आग लागली होती. पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीट हे प्रसिद्ध कपड्यांचे मार्केट आहे.
अत्यंत तोकड्या जागेत असलेले हे मार्केट अनेक पुणेकरांचे आकर्षण राहिलं आहे. या आगीत व्यापाऱ्यांचे लाखोंचे रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही वर्षांपासुन हे मार्केट इथून हलवण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे आग नेमकी लागली कशी याची चौकशी करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
आगीत काही कोटींचे नुकसान झाले असून आत जाण्यासाठी मार्ग नसल्याने मोहम्मद रफी चौक, मोती बिल्डिंगची गल्ली, आणि फॅशन स्ट्रीटच्या बाहेर फायर ब्रिगेडच्या गाड्या थांबवल्या होत्या.
२०१७ मध्ये मुंबईतील कमला मिल परिसरात आगीची दुर्घटना घडली होती, त्यानंतर पुणे येथील फॅशन स्ट्रीटचे कॅन्टोन्मेंट, पुणे मनपा व पिंपरी चिंचवड मनपाने २०१८ साली संयुक्त रित्या फायर ऑडिट करत फॅशन मार्केट धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता.
पहा कॅम्पमधील अग्नितांडवाचे भयावह फोटो...