लय भारी! पुण्यात उत्साह,आनंद अन् जल्लोष भारी, कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी.. By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 10:58 AM 2021-01-16T10:58:12+5:30 2021-01-16T11:36:22+5:30
देशातील ऐतिहासिक कोरोना लसीकरणाला सुरुवात होत असताना पुणेकरांची आजची पहाट प्रचंड प्रेरणादायी आणि उत्साही वातारणात उगवली..पुण्यातील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्सेस यांनी लसीकरणाला सुरुवात करण्याअगोदर रुग्णालय परिसरात काढलेली नयनरम्य रांगोळी... पुण्यातील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्सेस यांनी लसीकरणाला सुरुवात करण्याअगोदर रुग्णालय परिसरात काढलेली नयनरम्य रांगोळी (छायाचित्रे : तन्मय ठोंबरे आणि पुणे लोकमत टीम)
पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर ते कोविड लसीकरणाचा पहिला टप्पा खूप खडतर आणि परीक्षा पाहणारा होता..
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट च्या कर्मचाऱ्यांनी अविरत मेहनत करत कोविशील्ड लसची निर्मिती करून पुण्यासह जगाला कोविड संकटावर मात करण्याची आशा जागविली
कोरोना लसीकरणा अगोदर पुण्यातील रुग्णालयात संपूर्ण तयारी करण्यात आली होती
कमला नेहरू रुग्णालयासमोर मोठी मंडपी कमान उभारून उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यात आले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर कोरोना लसीकरणाला शहरात सुरुवात होणार
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार ,विभागीय आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल हे सर्व जण लसीकरण केंद्रावर हजर
कोरोना लसीकरणाच्या पूर्वी डॉक्टर व लास घेणाऱ्या महिलांनी एकमेकांना दिल्या लई भारी शुभेच्छा
पुण्यात कोरोना संकट काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणाऱ्या कोरोना योद्धयांची अनोखी व अप्रतिम कला..