Photos: पुणे शहरात रस्त्यांची लावलीय ‘वाट’ अन् नीट काम करण्याचा नाही ‘धाक’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:23 PM2022-01-21T18:23:05+5:302022-01-21T18:28:16+5:30
शहरातील मध्यवर्ती भागातील मुख्य रस्त्यांची ‘वाट’ लावली असल्याने पुणेकर संतप्त झाले आहेत. कारण या कामामुळे एकतर वाहतूक कोंडीचा त्रास आणि त्यात प्रचंड धूळ उडत आहे. त्याने अनेकजण आजारी पडले असल्याच्या तक्रारी तेथील नागरिकांनी केल्या आहेत. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, हत्तीचौक रस्ता अशा प्रमुख रस्त्यांवर कामे सुरू आहेत. त्याचा त्रास मात्र पुणेकरांना भोगावा लागत आहे. ही सर्व कामे त्वरीत पूर्ण करून चांगले रस्ते मिळावेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. काही ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. ( सर्व छायाचित्रे :- तन्मय ठोंबरे )