बघा विविध रंगांचे गुलाब, जे मोहून टाकतील तुमचे मन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 19:48 IST2020-01-04T19:35:47+5:302020-01-04T19:48:04+5:30

एका गुलाबाच्या पाकळीत लपलेल्या विविध रंगाच्या छटा
पुण्यातल्या मुकुंदनगर भागातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात 'विंटर रोज शो' नावाने हे प्रदर्शन सुरु आहे. रविवारपर्यंत ५ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन खुले असणार आहे.
अनेकांनी या फुलांची छबी टिपण्यासाठी मोबाईल कॅमेऱ्याची मदत घेतली.
या प्रदर्शनात रंगबेरंगी गुलाबाची फुले आकर्षक रंगसंगती मांडण्यात आली आहेत.
याच प्रदर्शनातील काही आकर्षण गुलाबपुष्पांची छायाचित्रे टिपली आहेत लोकमत प्रतिनिधी तन्मय ठोंबरे याने.
जांभळ्या रंगाच्या या गुलाबाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.