Supriya Sule: भगवं उपरणं घालून हनुमान आरती, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 03:26 PM 2022-04-17T15:26:35+5:30 2022-04-17T15:39:00+5:30
हनुमान जयंतीच्या निमित्ताने मनसेकडून पुण्यात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. तर, शिवसेनेकडून दादरमध्ये अशीच महाआरती पार पडली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिंदींवरील भोंग्याचा मुद्दा उचलून धरल्यानंतर हनुमान जयंतीच्यानिमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल्याचे दिसून आले.
हनुमान जयंतीच्या निमित्ताने मनसेकडून पुण्यात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. तर, शिवसेनेकडून दादरमध्ये अशीच महाआरती पार पडली.
शिवसेना नेते सदा सरवणकर यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या महाआरतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. आदित्य ठाकरेंच्याहस्ते येथे आरती करण्यात आली.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुण्यातील कर्व्हे नगरच्या हनुमान मंदिरात आरती केल्याचे फोटो ट्विटरवरुन शेअर केले आहेत.
सुप्रिया सुळेंनी शेअर केलेल्या या फोटोत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गळ्यात भगवं उपरणं परिधान करुन मंदिरात दिसत आहे.
सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हा फोटो सध्या व्हायरल होत आहेत. दुसरीकडे मनसेनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या हनुमान आरतीवरुन त्यांना टोला लगावला आहे.
''संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले होते, सहजच आठवलं त्याचा नास्तिकांनी आणि नव पुरोगाम्यांनी केलेल्या महाआरतीशी संबंध नाही,'' असे म्हणत देशपांडेंनी महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांवर टिका केली आहे.
राज्यात सध्या हनुमान चालिसा म्हणण्यावरुन चांगलंच राजकारण होताना दिसत आहे, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.