दाटले रेशमी धुके..! ...जेव्हा पुण्यावर पसरते मनमोहक धुक्याची जादू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 14:40 IST2020-12-15T14:00:14+5:302020-12-15T14:40:36+5:30
संपूर्ण ढगाळ वातावरण, अंगाचा झोंबणारे थंडगार वारे आणि मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरी अशा परिस्थितीत पुणेकर व पिंपरी शहरवासीयांनी मंगळवारी हिल स्टेशनसारखे वातावरण अनुभवले.

ढगाळ वातावरण, अंगाचा झोंबणारे थंडगार वारे आणि मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरी; पुणेकरांनी अनुभवले हिल स्टेशनसारखे वातावरण ( सर्व छायाचित्रे : अतुल मारवाडी)
दाटे धुके भोवती फसवे आज का माझ्या मना..(पिंपरी चिंचवड शहरावर पसरलेली धुक्याची झालर)
मखमली धुक्याची जादू साद घाली तरुणाईला
पुणे आणि पिंपरीकरांच्या सेवेत लवकरच सेवेत रुजू होणाऱ्या नाशिक फाटा येथील मेट्रोच्या ब्रिजवरचे धुके
सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे पुणे शहर व जिल्ह्यात दाट धुके पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती..
काळेवाडी येथे सूर्योदयाच्या काही क्षण टिपलेले हे मनमोहक दृश्य