ऐतिहासिक शनिवार वाड्याभोवती अस्वच्छतेची तटबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 17:03 IST2019-05-27T16:56:41+5:302019-05-27T17:03:21+5:30

पुण्याचे वैभव म्हणून ओळखला जाणारा शनिवारवाडा सध्या कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे.

वाड्याचा सर्व बाजूंनी कचऱ्याचे साम्राज्य असून महापालिकेने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे.

देश विदेशातले पर्यटक शनिवार वाड्याला भेट देत असताना त्याच्या सभोवती मात्र स्वच्छतेचा अभाव आहे.

या वास्तूचे जतन करण्याऐवजी संरक्षक भिंतीला खेटून कचरा जाळला जात आहे.

बेकायदा पार्किंग, बेघरांसाठी आश्रयस्थान आणि कचऱ्याचे आगार असे दृश्य वाड्याच्या बाहेरून दिसत असून पुणेकर त्याविषयी नाराजी व्यक्त करत आहे. (सर्व छायाचित्रे : तन्मय ठोंबरे)