आठवड्याचे राशीभविष्य : 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2021, 'या' राशीच्या मंडळींना सुखद धक्का; विरोधकांवर करणार मात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 11:02 AM2021-08-03T11:02:18+5:302021-08-03T11:22:30+5:30

Weekly Horoscope 1 August to 7 August 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण आपले व्यक्तिमत्व खुलविण्यासाठी पैसे सुद्धा खर्च कराल. तसेच आपण नवीन कपडे व उपकरणे खरेदी करू शकाल. आपल्या वाणीने आपण इतरांना प्रभावित करू शकाल व त्यामुळे आपली बहुतांशी कामे विनासायास पूर्ण होऊ शकतील. कुटुंबात एकोपा असल्याचे दिसून येईल. नोकरीत आपला मान - सन्मान वाढेल. आपले वरिष्ठ आपली प्रशंसा करतील. प्रणयी जीवनात चांगले अनुभव येऊन आपल्या प्रिय व्यक्तीस आपल्या प्रेमाच्या बंधनात अडकवण्याची संधी मिळेल. विवाहितांना वैवाहिक सुखाचा उपभोग घेता येईल. व्यापारात प्रगती होईल. आपल्या संततीच्या मदतीने सुद्धा आपणास काही फायदा होईल. आपली प्रकृती उत्तम राहिल्याने आपली इच्छापूर्ती करण्यात आपण यशस्वी व्हाल.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपल्या प्रकृतीवर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून आपणास विनाकारण काळजी करण्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. तसे पाहू गेल्यास आपली प्रकृती चांगलीच राहील, मात्र तणावामुळे आपल्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कुटुंबात एखादे धार्मिक कार्य होईल. आपण कुटुंबियांसह चित्रपट बघावयास जाण्याची योजना तयार करू शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांना चांगल्या ऑफर्स मिळतील. आपले वरिष्ठ आपल्या कामगिरीने खुश होतील. व्यापाऱ्यांना त्यांच्या कष्टांचे चांगले फल मिळेल. ह्या आठवड्यात अनपेक्षितपणे आपण एखादा मोठा सौदा कराल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपणास काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. आपल्या आयुष्यात अजून कोणी व्यक्ती आली नसल्यास ह्या आठवड्यात ती येण्याची संभावना आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपला वैवाहिक जोडीदार आपल्या कुटुंबात स्वतःची ओळख निर्माण करेल. आपल्या जोडीदाराने केलेल्या प्रशंसेमुळे आपण खुश व्हाल. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल आहे.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. विद्यार्थी एकाग्रतेने आपले अध्ययन करू शकतील. स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आपणास खूप मेहनत करावी लागेल. आपणास कुटुंबियांचे सहकार्य मिळाल्याने आपले समाधान होईल. आपली प्रकृती उत्तम राहील. एखाद्या व्यक्तीशी गैरसमज होऊन खूप त्रास होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कष्टांचे यथोचित फल मिळेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी उन्नतीदायक आहे. आपणास वैवाहिक जीवनातील तणावा पासून मुक्ती मिळेल. आपल्या मनात जोडीदारासह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचे विचार येतील. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला असून आपल्या प्रिय व्यक्तीच्या मनातील भावना आपण सहजपणे ओळखू शकाल.

आठवड्याच्या सुरवातीस आपल्या मधुर वाणीने आपण इतरांना प्रभावित करू शकाल. हा आठवडा आपल्या वैवाहिक जीवनात संघर्ष निर्माण करणारा आहे. ह्या दरम्यान आपला वैवाहिक जोडीदार व आपल्यात अहंकार आड येण्याची शक्यता आहे. प्रवासातून फायदा होण्याची शक्यता आहे. आयात - निर्यात व्यवसायात यश प्राप्त होईल. आपण विरोधकांवर मात करू शकाल. सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळू शकेल. कोणत्याही दस्तावेजावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्याचे लक्षपूर्वक वाचन करावे. जर विद्यार्थ्यांनी सावधपणे व धैर्यपूर्वक अध्ययन केले तर त्यांना यश प्राप्तीची शक्यता आहे. असे असले तरी स्पर्धा परीक्षेत यश प्राप्तीसाठी त्यांना खूपच मेहनत करावी लागेल. ह्या आठवड्यात आपला क्रोध आपली एकाग्रता भंग करण्यास कारणीभूत होण्याच्या शक्यतेमुळे मौन व संयम ह्यांचे पालन करावे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला असला तरी आपणास एकमेकांच्या भावनांचा आदर करावा लागेल. नव्याने प्रणयी जीवन सुरु करणाऱ्यांनी सावध राहावे. कौटुंबिक संबंध चांगले व लाभदायी होतील. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक लहान - सहान तक्रारी उदभवतील. आपल्या आहारात पौष्टिक व आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करावा, अन्यथा पोटाचे विकार होण्याची संभावना आहे.

हा आठवडा आपणास भरपूर आरामदायी राहणारा आहे. आपणास एक प्रकारची शांतता जाणवेल व त्यामुळे आपण आपल्या कामात प्रगती साधू शकाल. ह्या आठवड्यात व्यापारासाठी आपण दूरवरच्या प्रवासास जाऊ शकाल. काही व्यापाऱ्यांना परदेशी जाण्याची संधी सुद्धा मिळेल. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारात काही नवीन प्रयोग करावे लागतील. नोकरी करणाऱ्या जातकांना यश प्राप्तीसाठी आपल्या स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवावा लागेल. सहकाऱ्यांशी सौहार्दतेने वागल्यास आपणास त्यांची मदत होऊ शकेल. विवाहितांना वैवाहिक जीवनात प्रगती साधण्याची संधी मिळेल. आपणास संतती संबंधित एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रेमीजनांना आपल्या प्रिय व्यक्तीशी विवाह बंधनात अडकण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी त्याचा / तिचा प्रस्ताव स्वीकार्य होऊ शकेल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील. आपला आत्मविश्वास वाढेल. हा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपल्या अनेक योजना यशस्वी होतील. आपणास चांगला फायदा होईल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. त्यामुळे आपणास सकारात्मक परिणाम व सामाजिक स्तरावर मान्यता प्राप्त होईल. आपली प्रकृती उत्तम राहील. आपण आपल्या विरोधकांवर मात करू शकाल. कोर्ट - कचेरीच्या बाबतीत मात्र थोडी काळजी घ्यावी लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांची कामगिरी चांगली होईल. व्यापारात चढ - उतार येतील. प्रेमीजनांनी थोडी काळजी घेतल्यास त्यांच्या नात्यातील गोडवा टिकून राहील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल.

आठवड्यात आपणास चांगले परिणाम मिळाल्याने आपण सुखावून जाल. कुटुंबातील समस्या दूर होऊन आपसातील प्रेमात वाढ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांचा खूप मोठा फायदा होईल. आपली कामगिरी उत्तम झाल्याने आपली प्रशंसा केली जाईल. आपले वरिष्ठ सुद्धा आपल्यावर खुश होतील. नवनवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. कामाच्या बाबतीत आपणास एखादी चांगली बातमी मिळेल. व्यापारात यश प्राप्त झाल्याने आपण आनंदित व्हाल. प्रेमीजन आपल्या प्रिय व्यक्तीसह बाहेर फिरावयास जाण्याचा कार्यक्रम ठरवून आपल्या नात्याचा आनंद घेऊ शकतील. विवाहितांना आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या काही गरजा पूर्ण कराव्या लागतील. त्यासाठी आपणास थोडे पैसे खर्च सुद्धा करावे लागतील, मात्र त्याने आपले समाधान होईल. आपले आरोग्य उत्तम राहील.

हा आठवडा आपल्यासाठी अंशतः फलदायी आहे. आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. एखाद्या कामातील व्यस्ततेमुळे आपले स्वतःकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक परिस्थिती आपल्या नियंत्रणात राहील. आपण आपली जवाबदारी पूर्ण करू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. आपल्या नात्यात आपण जवाबदारी आड येऊ न देता एकमेकांप्रती समजूतदारपणा दाखवाल. त्यामुळे आपले नाते अधिक दृढ होईल. प्रेमीजनांच्या जीवनात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी. नोकरी करणारे जातक कामाचा आनंद घेऊ शकतील. त्यामुळे त्यांची कामावरील पकड अधिक मजबूत होईल. व्यापार चांगला चालेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण आपल्या संततीसाठी नवीन काहीतरी करून खुश व्हाल. आपली संतती ह्या दरम्यान आपले प्रेम आपणास व्यक्त करून संबंध अधिक दृढ करेल. वैवाहिक जीवनातील समस्या कमी झाल्याने नाते अधिक दृढ होईल. प्रेमीजनांना आपले नाते अधिक दृढ करण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील. ह्या संधी वाया दवडू नका. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्य आहे. आपणास कोठे कोठे सुधारणा करण्यास वाव आहे हे शोधावे लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा चढ - उतारांचा आहे. आपली कामे इमानदारीने करावीत. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

ह्या आठवड्यात आपणास नवीन काही संधी मिळतील. आपणास आपल्या कौटुंबिक गरजा लक्षात घेऊन आपल्या प्राप्तीत वाढ होण्यासाठी काही नवीन निर्णय घ्यावे लागतील. ह्या आठवड्यात आर्थिक गुंतवणूक करणे हितावह होणार नसल्याने त्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपला वैवाहिक जोडीदार संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करेल व त्यामुळे आपणास नात्यात नवेपणा जाणवेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सुद्धा चांगला आहे. आपली प्रिय व्यक्ती आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करेल व आपण त्याचा गंभीरतेने स्वीकार कराल. आपली प्रकृती चांगली राहिली तरी आपणास रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता आहे. वाहन सावकाश चालवावे. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी काहीसा निराशाजनक असण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी मात्र हा आठवडा चांगला आहे.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपली ऊर्जा वाढल्याने आपण कामात यशस्वी होऊ शकाल. आपण सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण कराल व त्यामुळे आपणास बराचसा मोकळा वेळ मिळू शकेल. ह्या मोकळ्या वेळेत आपण कुटुंबीय व स्वतःकडे लक्ष द्याल. आपल्या गरजा पूर्ण करण्यावर आपला भर राहील. वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. नात्यातील जवळीक व आकर्षण वाढेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीस एखादी चांगली भेटवस्तू देऊ शकाल. त्यामुळे आपली प्रिय व्यक्ती प्रभावित होऊन आपली प्रशंसा करू लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामातून बरकत मिळेल. आपली कामात प्रगती होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या योजना फलद्रुप होतील. आपणास काही नवीन लोकां बरोबर काम करून मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करता येईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांची अभ्यासात चांगली प्रगती होईल.

हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच कामात मिळालेल्या यशामुळे आपला आत्मविश्वास द्विगुणित होईल. आपण आपल्या व्यापारात प्रगती साधण्यासाठी काही नवीन सौदे कराल. काही नवीन मार्गदर्शक तत्वे तयार कराल. त्याचा आपणास चांगला लाभ सुद्धा होईल. नोकरी करणाऱ्या जातकांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. आपल्या कामावरच मेहनत घ्यावी. त्यामुळे आपली कामगिरी चांगली होईल. ह्या आठवड्यात पूर्वीच्या प्रमाणात प्रकृती चांगली राहिली तरी आपणास आपल्या आहारावर लक्ष द्यावे लागेल. अन्यथा आपणास प्रकृतीचा त्रास होण्याची संभावना आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपल्या वैवाहिक जोडीदाराशी नाते अधिक दृढ होऊन जवळीक वाढेल. प्रेमीजनांना सुद्धा हा आठवडा आनंद देणारा आहे. आपली प्रिय व्यक्ती आपणास समजून घेईल व त्यामुळे आपण आनंदित व्हाल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अध्ययनात यश प्राप्त होईल.