आठवड्याचे राशीभविष्य : 10 जानेवारी ते 16 जानेवारी 2021, 'या' राशीच्या लोकांना धनलाभ होणार; मानसिक सुख मिळणार By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 07:59 AM 2021-01-11T07:59:50+5:30 2021-01-11T08:44:48+5:30
Weekly Horoscope 10 January to 16 January 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... मेष हा आठवडा आपणास मध्यम फलदायी आहे. आपण काही कारणांमुळे चिंतातूर व्हाल. असे असले तरी वेळेनुसार कार्यरत राहून आपण यशस्वी होऊ शकाल. आपल्या प्रणयी जीवनास खुलवण्यासाठी एखाद्या प्रेक्षणीय स्थळी फिरावयास जाल. आपल्या वडीलधाऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. तसेच त्यांच्या सहवासात थोडा वेळ घालविणे सुद्धा उचित होऊ शकेल. नोकरीत आपल्या परिश्रमाचे यथायोग्य फळ मिळेल. तसेच वरिष्ठांकडून आपण प्रशंसित व्हाल. ह्या आठवड्यात व्यापारीवर्गास चांगला फायदा होईल. एखाद्या स्मृतिस्थळाची माहिती मिळू शकेल अशा ठिकाणी विद्यार्थी सहलीस जाऊ शकतील. निरोगी राहण्यासाठी आपण चांगला व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवाल. त्यामुळे आपली प्रकृती चांगली राहील. दूरवरचे प्रवास करण्याची संधी मिळेल.
वृषभ मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागल्याने हा आठवडा मध्यम फलदायी ठरेल. आपण आपल्या कामात गुरफटून गेल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होऊन कोणतेही काम आपण पूर्ण करू शकणार नाही. वैवाहिक जीवनात तणाव वाढण्याची शक्यता आहे. असे असले तरी प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. प्रियव्यक्तीच्या सहवासात राहण्याची संधी प्राप्त झाल्याने आपल्या प्रेमास बहर येईल. व्यापारात आपल्याच माणसाकडून दगाफटका होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. त्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. एखाद्या कायद्याच्या कचाट्यात सापडून आपणास थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायद्याच्या विरुद्ध कोणतेही कार्य करू नये.
मिथुन हा आठवडा आपणास मध्यम फलदायी ठरणारा आहे. आपण मानसिक काळजी करण्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या आरोग्यात सुधारणा होऊ शकेल. आपणास आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता सुद्धा आहे. वैवाहिक जीवन समाधानी राहील. आपणास वैवाहिक जोडीदाराच्या लटक्या रागास सामोरे जावे लागेल. प्रेमी युगलांना मात्र काही क्षुल्लक कारणांनी वादग्रस्त प्रसंगांना तोंड द्यावे लागण्याच्या शक्यतेमुळे थोडे सावध राहावे लागेल. आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत एखादा सहकारी अडथळे निर्माण करण्याची शक्यता असल्याने आपणास सावध राहावे लागेल. व्यापारीवर्गासाठी हा आठवडा उत्तम आहे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
कर्क हा आठवडा आर्थिक दृष्ट्या सर्वोत्तम ठरणारा आहे. आपल्या व्यस्ततेमुळे कुटुंबीय, मित्र व समाजासाठी आपण वेळ काढू शकणार नाही. उलट आपले व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करण्यावर आपण भर द्याल. असे असले तरी वरिष्ठांशी संवाद साधताना आपणास सावध राहावे लागेल. ह्या आठवड्यात आपणास वडीलधाऱ्या व्यक्ती, उच्च पदस्थ, शासकीय कर्मचारी सहित इतर वरिष्ठ व्यक्तींशी संवाद साधताना संयमित राहावे लागेल. आठवड्याच्या अखेरीस एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी खर्च करावा लागेल असे दिसत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सामान्य फळे देणारा आहे. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करण्यास तयार राहावे लागेल. आठवड्याचे मधले दिवस आरोग्याच्या बाबतीत आपणास दिलासा देणारे आहेत. असे असले तरी काही तणाव निर्माण झाल्यामुळे आपली झोप उडण्याची शक्यता आहे. नोकरी - व्यवसायात अतिरिक्त शारीरिक व मानसिक ताण घेऊ नका. नशिबाच्या बाबतीत हा आठवडा सामान्यच आहे.
सिंह हा आठवडा आपणास चांगला फलदायी ठरणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण एखादा प्रवास करू शकलात तरी त्यात काही अडथळे निर्माण होतील. आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता असून आठवड्याच्या मधल्या दिवसांपासून त्यात सुधारणा होऊ लागेल. आपण कुटुंबियांना वेळ देऊ शकाल. आवश्यक असलेले खर्च सुद्धा कराल. कुटुंबात एकमेकांबद्धल आपुलकी राहील. प्रेमी युगलांना मात्र काही समस्यांना सामोरे जावे लागेल. एखाद्या अन्य व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे आपल्या संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदमय राहील. त्यांच्यात गोडवा निर्माण होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामात योग्य लक्ष न दिल्यास नोकरी गमावून बसण्याची पाळी येईल. व्यापाऱ्यांना एखादी संधी लाभून मोठा लाभ होऊ शकेल. आपल्या मनात सतत धार्मिक विचार येतील. विद्यार्थ्यांना काही अडथळ्यांना सामोरे जावे लागेल, मात्र तांत्रिक विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील.
कन्या या आठवड्याच्या मध्यास जीवनातील अनेक चढ - उतार आपल्या अनुभवास येतील. आपले आरोग्य सामान्यच राहील. मात्र, ऋतुगत त्रासापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपल्या प्राप्तीत उल्लेखनीय वाढ झाल्यामुळे आपला आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन नवीन काही करण्याची आपणास प्रेरणा होईल. काही समस्यांमुळे नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मनात नोकरीत बदल करण्याचे विचार येऊ लागतील. व्यापारीवर्गास चांगला फायदा होईल. विशेषतः सल्लागार, लोखंडाचे व्यापारी व माध्यमांशी संबंधित व्यक्तींना खास लाभ होऊन त्यांच्या व्यापारास गती येईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदमय होईल. आपल्या जोडीदाराची प्रगती होईल. त्यामुळे आपणास मनापासून आनंद होईल. प्रेमी युगलांसाठी हा आठवडा चांगला आहे.
तूळ आठवड्यात आपण आपल्या जबाबदाऱ्या ओळखून कुटुंबीयांप्रती असलेली आपली कर्तव्ये पार पाडाल. हा आठवडा आपणास सामान्य फलदायी ठरणारा आहे. नोकरीत आपल्या परिश्रमाचे परिणाम स्पष्टपणे दिसून येतील. त्यामुळे आपल्यावर इतर जवाबदाऱ्या सोपविण्यात येऊ शकतात. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल असून आपणास अपेक्षित असलेले परिणाम मिळतील. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील व कुटुंबात एकोपा निर्माण होऊन प्रत्येकजण आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदमय राहील. कदाचित आपला जोडीदार एखाद्या बाबतीत घाई करेल, मात्र त्याचे परिणाम प्रतिकूल होतील. अशा वेळेस आपणास लक्ष घालावे लागेल. प्रेमी युगलांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या प्रियव्यक्तीस आपण कुटुंबीयांची ओळख करून देऊ शकाल. आपले आरोग्य चांगले राहिले तरी अधून मधून थोडा ताप येण्याची शक्यता आहे. प्रवासासाठी आठवड्याचे मधले दिवस अनुकूल आहेत
वृश्चिक हा आठवडा आपणास अनुकूल आहे. आपण स्वतःवर अधिक लक्ष केंद्रित करून प्राप्तीत वाढ करण्याचा प्रयत्न कराल. त्याचा आपणास फायदा होऊन आपली आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. आपले आरोग्य उत्तम राहील, तसेच तंदुरुस्त राहण्यासाठी आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत आपल्या कष्टाचे चीज होईल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपली व्यापारी नीती अधिक दृढ केल्याचा आपणास फायदा होईल. कुटुंबात एकोपा राहील. प्रेमी युगलांना आपल्या प्रियव्यक्तीसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याची संधी मिळू शकेल. विवाहितांना वैवाहिक जीवनात आनंद व समाधान लाभेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
धनु हा आठवडा आपणास मध्यम फलदायी ठरणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपल्या खर्चात वाढ झाल्याने आपण चिंतीत व्हाल, परंतु लगेच काही दिवसात परिस्थितीत बदल होऊन आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. विरोधकांनी आपणास त्रास देण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यात त्यांना यश मिळणार नसल्याने आपण काळजी करू नये. आपल्या व्यक्तिमत्वातील आकर्षण वाढेल. लोक आपल्याकडे येऊ लागतील. नोकरी करणाऱ्यांना आपल्या परिश्रमाचे यथोचित फळ मिळेल. आपणास शासनाकडून काही लाभ मिळण्याची शक्यता सुद्धा आहे. व्यापारीवर्गासाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आपल्या कामाच्या विस्तारासाठी आपणास दूरदर्शीपणा ठेवावा लागेल. आपण एखादा नवीन मोबाईल किंवा लॅपटॉप खरेदी करण्याची शक्यता सुद्धा आहे. विवाहितांना आपल्या जीवनात प्रेमाची व आपुलकीची अनुभूती आल्याने त्यांचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रेमीजनांना आठवड्यात थोडे सावध राहावे लागेल. प्रवासासाठी आठवड्याचे अखेरचे दिवस अनुकूल आहेत.
मकर हा आठवडा आपणास अत्यंत अनुकूल आहे. आपल्या प्राप्तीत सतत वाढ होत राहिल्याने आपण खर्चावर नियंत्रण ठेवू शकाल व त्यामुळे वित्तीय नियोजन करणे आपणास सहज शक्य होईल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासासाठी आठवड्याचा शेवटचा दिवस जास्त अनुकूल आहे. आपल्या सुखसोयीत वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना कामानिमित्त प्रवास करावे लागतील. विवाहितांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे. आपल्या वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. प्रणयी जीवनात मात्र आपल्या प्रियव्यक्तीशी काही कारणाने वाद झाल्याने स्वतःला सिद्ध करावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी आठवड्याचे सुरुवातीचे दिवस अनुकूल आहेत.
कुंभ हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित केल्याने कामात येणाऱ्या अडचणींवर आपण सहजपणे मात करू शकाल. आपण कौटुंबिक गरजा समजून घ्याल व त्या पूर्ण करून कुटुंबियांना खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल. आरोग्यात सुधारणा झाली तरी आपल्या आहारावर लक्ष ठेवावे लागेल. वजन वाढण्याची शक्यता आहे, तसेच पायांना दुखापत होण्याची सुद्धा शक्यता आहे. प्राप्तीत वाढ होईल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहवासात रात्री भोजन करण्याची संधी मिळेल. आपले संपर्क वाढतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. व्यापाऱ्यांची व्यापारात चांगली प्रगती होईल. नफा वाढेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या प्रणयी जीवनात माधुर्य राहील. मात्र, विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. जोडीदाराच्या मदतीमुळे आपणास एखादा मोठा फायदा संभवतो. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांची अध्ययनात प्रगती होईल. त्यांच्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे.
मीन हा आठवडा आपणास अनुकूल असा आहे. आपणास नशिबाची साथ मिळाल्याने आपली बरीच कामे सुरळीतपणे होऊ शकतील. आर्थिक प्राप्ती होईल. आपली आर्थिक स्थिती प्रबळ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. मात्र, लक्ष्यांक पूर्ण न झाल्याने सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता सुद्धा आहे. बोलताना संयमित राहावे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा उन्नतिकारक आहे. आपल्या व्यापारास गती येईल. आपले आरोग्य उत्तम राहिल्याने आव्हानांचा सामना करण्यास आपण तयार व्हाल. मित्रांचा सहवास घडेल. प्रणयी जीवन आनंदी राहील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी हा आठवडा अत्यंत चांगला आहे. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अधिक अनुकूल आहेत.