आठवड्याचे राशीभविष्य : 17 जानेवारी ते 23 जानेवारी 2021, "या" राशीच्या मंडळींची प्रतिष्ठा वाढणार, प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 10:14 AM2021-01-18T10:14:28+5:302021-01-18T10:50:00+5:30

Weekly Horoscope 17 January to 23 January 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

हा आठवडा आपल्या आनंदात भर घालणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपणास जीवनातील आनंद अनुभवता येईल. आपल्या प्रणयी जीवनात प्रगती होईल. आपल्या प्रियव्यक्तीशी आपल्या व्यवसाया विषयी चर्चा करून तिचा व्यवसायासाठी अभिप्राय घेऊन तिला प्रभावित करण्याचा प्रयत्न आपण कराल. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती नाजूक होण्याची शक्यता असल्याने त्यांची काळजी घ्यावी. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे. व्यापारीवर्गास आनंददायी बातमी मिळेल. आपल्या प्राप्तीत भरघोस वाढ झाल्याने खर्चावर आपले नियंत्रण राहून आपण वित्तीय नियोजन उत्तम प्रकारे करू शकाल. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती प्रबळ होईल. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल. आपले आरोग्य चांगले राहिले तरी कंबरदुखीचा त्रास संभवतो. आठवड्यात आपणास एखाद्या सहलीस जाण्याची संधी मिळाल्याने आपल्या आनंदात भर पडेल.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी स्थिती आपणास अनुकूल असल्याने आपण लक्ष देऊन कामे कराल. असे असले तरी काही कामांच्या बाबतीत गोंधळ होऊन त्याचे आपणास स्पष्टीकरण द्यावे लागेल. आपण जर शासकीय नोकरीत असाल तर आपणास चौकशीस सामोरे जावे लागू शकते. सरकारी क्षेत्राशी संबंधित एखाद्या समस्येचा आपणास त्रास होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून न घेतल्यामुळे कटुता वाढण्याची शक्यता आहे. प्रणयी जीवनात मात्र आपणास आनंद अनुभवास मिळेल. आपणास मित्रांचा सहवास घडेल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आपण नवीन काही करण्याचा प्रयत्न कराल. आपल्या हातून समाज कल्याणाचे एखादे कार्य होऊ शकेल. प्रकृती नाजूक होण्याच्या शक्यतेमुळे आरोग्याची काळजी घ्यावी.

आठवड्याची सुरुवात चांगली होईल. आपण एखाद्या प्रवासाचे आयोजन सुद्धा करू शकाल. हा प्रवास महत्वाचा होणार असला तरी प्रवासा दरम्यान आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता असल्याने आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. काही महत्वाची कागदपत्रे हरवण्याची शक्यता असल्याने त्यांची काळजी घ्यावी. प्रेमी युगलांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या प्रियव्यक्तीस विवाहाची मागणी घालू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदमय राहील. आपल्या संबंधात प्रेम व प्रणयालाप वृद्धी होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना एखादी कायदेशीर बाब त्रास देईल, तेव्हा सावध राहावे. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा चांगला असला तरी करचोरीचा विचार सुद्धा आपल्यासाठी घातक ठरेल. आपले आरोग्य सामान्यच राहील.

आठवड्याच्या सुरुवातीस आपण एखाद्या विशेष व्यक्तीप्रती आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकाल. आठवड्याच्या सुरुवातीस घेतलेला एखादा धाडसी निर्णय आपल्या वैयक्तिक जीवनास स्थैर्य देण्याचे कार्य करेल. आपल्या भावना सहजपणे लोकांपर्यंत आपण पोहचवू शकाल. आठवड्यात आपल्या भावनांप्रती आपण अधिक संवेदनशील व्हाल. व्यावसायिक जीवनात आपण कठोर परिश्रम करून आपली कामे पूर्ण कराल व त्यामुळे आपली कीर्ती सुद्धा वाढेल. विविध लाभ मिळण्याची शक्यता आहे. असे असले तरी शासकीय व पैतृक संपत्तीशी संबंधित बाबीत धीर धरण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. आपणास आर्थिक स्थैर्य लाभेल. आठवड्याच्या अखेरीस एखाद्या चिंतेमुळे आपण बेचैन व्हाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. त्यांचे आपल्या अध्ययनात चांगले लक्ष लागू शकेल. आठवड्यात आपले आरोग्य चांगले राहील.

हा आठवडा आपली प्रतिष्ठा वाढवणारा आहे. आपली लोकप्रियता वाढेल. आपल्याकडे काही ना काही कामासाठी लोक येऊ लागल्याने आपल्या सभोवताली लोकांचा गराडा असेल. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल. त्याच बरोबर आपल्या खर्चात सुद्धा वाढ होईल. निष्कारण आपला बडेजाव दाखविण्याचा प्रयत्न केल्यास आपली आर्थिक स्थिती खालावू शकते. आरोग्यासाठी हा आठवडा अनुकूल नसल्याने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आपणास एखादी दुखापत होण्याची किंवा ताप येण्याची किंवा खोकला होण्याची शक्यता आहे. कोणतेही वाहन चालवताना ते काळजीपूर्वक चालवावे. नोकरी करणाऱ्यांची कामगिरी चांगली होईल. व्यापाऱ्यांचा फायदा वाढवून देणारा हा आठवडा आहे. कामात यश मिळाल्याने मन हर्षित होईल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवन आनंदमय होईल. प्रेमी युगलांना प्रेमालापाची संधी मिळेल.

हा आठवडा आपणास आंशिक फले देणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपणास काही मानसिक चिंता राहतील ज्या आपल्या त्रासास कारणीभूत ठरतील. आठवड्यात एखादे दुखणे डोके वर काढण्याची शक्यता असल्याने आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात चढ - उतार जाणवतील. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता सुद्धा आहे. प्रेमीजनांना थोडे सावध राहावे लागेल. एखाद्या बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे आपल्या प्रणयी संबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन आनंदमय राहील. घरात प्रेम वाढेल. नोकरी करणाऱ्यांचे त्रास वाढण्याची शक्यता असल्याने त्यांनी कामात काळजी घ्यावी. व्यापारीवर्गास चांगला फायदा होऊन प्राप्तीत सुद्धा वाढ होईल.

हा आठवडा आपणास मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस विद्यार्थी आपल्या अभ्यासाच्या वेळापत्रकानुसार अध्ययन करून यशस्वी होतील. आपल्या संततीवर आपण प्रेमाचा वर्षाव कराल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्यच राहील. घरगुती कामातून आपणास आवश्यक तितका वेळ न मिळू शकल्याने आपल्या प्रियव्यक्तीस आपण सतत भेटू शकणार नाही. विवाहितांचे वैवाहिक जीवन यथावतच राहील. आपण एकमेकांबद्धलच्या आपल्या जवाबदाऱ्या पार पाडून जोडीदारास योग्य तितकी साथ देऊ शकाल. कुटुंबात काही समस्या निर्माण होऊन वाद होतील. अशा परिस्थितीत आपणास मध्यस्थी करावी लागेल. नोकरीत आपल्या परिश्रमाचे यथोचित फळ मिळाले तरी काही व्यक्ती आपल्या विरुद्ध कट - कारस्थान रचण्याचा प्रयत्न करतील. व्यापारात आपल्या कष्टाचे चीज होऊन चांगले फळ मिळेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल असल्याने त्या दरम्यान प्रवास करावा. आठवड्याच्या अखेरीस वैवाहिक जोडीदारासह बाहेर फिरावयास जाण्याची संधी मिळेल.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊन कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करण्यास भरपूर वेळ द्याल. इतकेच नव्हे तर आपण आपल्या कामास सुद्धा तितकेच महत्व देऊन कुटुंब व काम ह्यात समतोल साधू शकाल. त्यामुळे आपली सर्वांवर पक्कड मजबूत होऊन आपली प्रतिमा सुधारेल. व्यापाऱ्यांना आपल्या तेजस्वी बुद्धीचा व नवीन तंत्राचा व्यापारासाठी फायदा होईल. आपणास आपल्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. त्यांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. प्रणयी व वैवाहिक जीवन आनंदमय राहील. आठवड्यात एखादा प्रवास संभवतो. हा प्रवास आपल्या मित्रांबरोबर करू शकाल. आठवड्यात आपले आरोग्य चांगले राहील.

हा आठवडा आपणास अत्यंत चांगला जाणारा आहे. आपण पूर्ण जोमाने आपले काम पूर्ण करू शकाल. आपल्यातील जोम व शक्ती वाखाणण्या जोगी असेल. लोकांना आपल्याकडून प्रेरणा मिळेल. नोकरी करणाऱ्यांचा हा आठवडा सुवर्णाक्षराने लिहिला जाईल. आपल्या कामाची प्रशंसा होऊन त्याचे चांगले फळ आपणास मिळेल. व्यापारीवर्गासाठी हा आठवडा काहीसा आव्हानात्मक असू शकतो. विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेमालापाने परिपूर्ण असल्याने एकमेकांप्रती आकर्षण असल्याचे जाणवेल. प्रेमी युगलांना ह्या आठवड्यात प्रेमात वृद्धी करण्यासाठी आपले व्यवहार काळजीपूर्वक करावे लागतील. आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची प्रकृती बिघडून आपणास त्रास होऊ शकतो. आपणास आपल्या प्रकृतीची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. अनेक पद्धतीने आपण कामे पूर्ण करू शकाल. त्याचे आपणास यथोचित फळ सुद्धा मिळेल. आपली निर्णय क्षमता दृढ राहिल्याने एकाच वेळी अनेक कामे आपण पूर्ण करू शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत चांगला आहे. त्यांच्या कामांना गती येईल. व्यापारीवर्गास अनेक लोकांच्या सहवासामुळे काही नवीन फायदे मिळू शकतील. प्राप्ती सामान्यच राहील. संपत्तीतून काही लाभ होईल. कौटुंबिक वातावरणात सकारात्मकता दिसून येईल. वैवाहिक जीवनात चढ - उतार येतील. असे असले तरी नात्यात दृढता येईल. आठवड्यात आपली प्रियव्यक्ती अनेक बाबतीत आपल्याशी स्पर्धा करण्याच्या शक्यतेमुळे प्रणयी जीवनात सावध राहावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

हा आठवडा आपणास चांगला जाईल. आपण स्वतःवर अधिक लक्ष केंद्रित कराल. आपल्या वागणुकीत झालेला बदल लोकांना आकर्षित करेल. त्यामुळे आपले कौटुंबिक जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदाराचे आपणास पूर्ण सहकार्य मिळेल. मात्र जोडीदाराच्या नादुरुस्त प्रकृतीमुळे त्यांच्या वागण्यात काही बदल होऊन नात्यात काही समस्या निर्माण होऊ शकतात. प्रेमी युगलांना ह्या आठवड्यात प्रेमालापाची संधी मिळेल. आपल्या प्रियव्यक्तीसह दूरवरच्या प्रवासास किंवा एखाद्या मेजवानीस जाऊन संबंध दृढ करण्याचा आपण प्रयत्न कराल. प्रकृतीत मात्र सतत चढ - उतार येतील. प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यास त्याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या प्रयत्नांना गती येईल. व्यापारीवर्गास मात्र थोडे सावध राहावे लागेल. हा आठवडा त्यांच्यासाठी काहीसा नाजूकच आहे. आठवड्यात कोणालाही उसने पैसे देऊ नये. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपणास सामान्य फले देणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासून आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपण विनाकारण एखाद्या गोष्टीने चिंतीत व्हाल, व त्यामुळे आपले आरोग्य बिघडू शकते. आपले खर्च वाढतील, मात्र जसे दिवस जातील तशी परिस्थिती सुधरू लागेल. आपल्या प्राप्तीत मोठी वाढ झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. त्यामुळे आपण आर्थिक नियोजन सुद्धा करू शकाल व आपला आत्मविश्वास सुद्धा वृद्धिंगत होईल. आपल्या काही योजना फलद्रुप झाल्याने व्यापारात गतीसह प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. आपणास चांगला नफा होईल. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामाचे चांगले फळ मिळेल. असे असले तरी आपल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न इतर लोक करण्याची शक्यता आहे. असे होऊ नये म्हणून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी सानिध्य वाढेल. कौटुंबिक जीवन सामान्यच राहील. आठवड्याचा शेवटचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.