आठवड्याचे राशीभविष्य : 24 जानेवारी ते 30 जानेवारी 2021, 'या' राशीच्या लोकांना भाग्योदयाचा योग, प्रियजनांची भेट होणार By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 09:15 AM 2021-01-24T09:15:58+5:30 2021-01-24T09:42:55+5:30
Weekly Horoscope 24 January to 30 January 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... मेष हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासून आपल्या प्राप्तीत कशी वाढ करता येईल यावर आपले लक्ष केंद्रित झालेले असेल. मात्र, त्यामुळे आपला मानसिक त्रास खूपच वाढणार असल्याने काळजी घ्यावी. प्रणयी जीवनात आपल्या प्रियव्यक्तीच्या नाराजीमुळे काही अडचणी येण्याची शक्यता असल्याने तिला खूश ठेवण्याचा प्रयत्न करावा. नोकरीत एखाद्या गोष्टीत आपला हट्ट सोडून न दिल्यास अपमानित व्हावे लागेल. व्यापारीवर्गासाठी हा आठवडा चांगला आहे. आपली प्राप्ती सामान्यच राहील. आपल्या अध्ययनावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी आपली एकाग्रता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. आपले आरोग्य चांगले राहिलॆ तरी आपणास थकवा व अशक्तपणा जाणवेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असली तरी, कामातील व्यस्ततेमुळे आपल्या प्रकृतीकडे आपले दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.
वृषभ हा आठवडा आपल्यासाठी चांगला असून आपणास चांगली प्राप्ती झाल्याने आपल्या अनेक विवंचना दूर होतील. खर्चात थोडी वाढ झाली तरी आपण त्यातून काही ना काही मार्ग शोधून काढू शकाल. आपली प्रकृती बिघडू नये म्हणून कोणत्याही प्रकारच्या मानसिक ताणापासून दूर राहावे. प्रकृती बिघडल्यास आपल्या अनेक कार्यात विघ्ने येऊ शकतात. कौटुंबिक जीवन सुखद व आनंदयुक्त असेल. आपण एखाद्या स्थावराची खरेदी करण्याचा प्रयत्न कराल. या आठवड्यात कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती आपल्या काळजीस कारणीभूत होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात तणावाचे वातावरण राहील, तेव्हा सावध राहावे. प्रेमीजनांना एखादी चांगली बातमी मिळाल्याने ते प्रेमात अधिक गुरफटतील. नोकरीत वरिष्ठांच्या रोषास सामोरे जावे लागेल. व्यापारीवर्गास विदेशी स्रोतातून एखादा नवीन मार्ग सापडेल.
मिथुन हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस वायफळ खर्च होणार असल्याने आपणास खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा आपली आर्थिक स्थिती नाजूक होऊ शकते. आपणास काही मानसिक त्रास होण्याची शक्यता सुद्धा आहे. शारीरिक आव्हानांना सामोरे जावे लागेल. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्राप्ती होण्याची शक्यता असल्याने काळजीस कारण उरणार नाही. वैवाहिक जीवनातील गोडवा टिकून राहील. आपले नाते दृढ होईल. प्रेमी युगलांना मात्र एकमेकांना समजून घ्यावे लागेल. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम करूनच यश प्राप्त करता येईल.
कर्क आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपला काही वास्तविकतेशी सामना होईल. आठवड्यात आपणास संबंधांच्या बाबतीत अधिक सतर्कता दाखवावी लागेल. संबंधातील कटुता टाळण्यासाठी आपणास दृष्टिकोन बदलावा लागू शकतो. आठवड्याच्या मध्यास आपल्यामुळे संबंधात येत असलेल्या दुराव्याची जाणीव आपणास होईल. ह्याचे सकारात्मक परिणाम आपणास व्यावसायिक जीवनात पाहावयास मिळतील. त्या दरम्यान आपण आपले जाळे विस्तारू शकाल. तसेच कुटुंबासाठी सुद्धा थोडा वेळ काढू शकाल. ह्या आठवड्यात आपणास काही चांगले करावयाचे असल्यास स्वतःसाठी काही नियम बनवावे लागतील. नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न सुद्धा करावा लागेल. असे केल्याने आपल्या जीवनास एक शिस्त लागून आपले निर्धारित लक्ष्यांक आपण सहजपणे गाठू शकाल. आठवड्याच्या अखेर पर्यंत आपल्या संवाद कौशल्यात सुधारणा झाल्याचे दिसून येईल. त्याचा फायदा आपणास संबंधांवर होताना दिसून येईल. विवाहितांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल असून आपण जोडीदाराच्या सहवासात भरपूर वेळ घालवू शकाल. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी मसालेदार पदार्थ खाण्याचे टाळून आहारात पौष्टिक पदार्थांचा वापर करण्याचा प्रयत्न करावा.
सिंह हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपल्या कामात आपण खूपच व्यस्त राहाल व कामातील समस्या आपला पार गोंधळ उडवून देतील. त्यातून बाहेर पडण्यास आपणास खूप वेळ लागेल. कुटुंबियांना सुद्धा आपली गरज लागेल तेव्हा आपल्या जबाबदाऱ्या आपणास समजून घ्याव्या लागतील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या प्रियव्यक्तीस एखादी भेटवस्तू देऊ शकाल. विवाहितांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. आपल्या वैवाहिक जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. व्यापारात काही अडचणी संभवतात. आठवड्यात आपल्या प्राप्तीपेक्षा खर्च अधिक होणार असल्याने आपणास खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नशिबाची साथ मिळाल्याने आपणास अनेक कामात त्वरित यश प्राप्त होईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीमुळे आपणास थोडा त्रास होईल. आपल्या आरोग्याकडे सुद्धा आपणास लक्ष द्यावे लागेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
कन्या हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण दूरवरच्या प्रवासास जाऊ शकाल. कुटुंबियांच्या सहवासात आपला वेळ आनंदात घालवू शकाल. आठवड्याच्या मध्यास कामावर लक्ष केंद्रित होऊ शकेल. कुटुंबात सुद्धा जिव्हाळा वाढेल. आठवड्याच्या अखेरीस आपल्या प्राप्तीत वाढ करण्याचा विचार आपण कराल. ह्या आठवड्यात आपली प्राप्ती खूपच चांगली असेल. अचानक धनप्राप्ती संभवते. बँके कडून घेतलेले कर्ज फिटू लागल्याने आपणास थोडा दिलासा मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. प्रेमीजनांना काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आठवड्याच्या सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल असून, ह्या दरम्यान केलेले प्रवास आनंददायी होतील. ह्या आठवड्यात संततीस आजारपण येण्याची शक्यता असल्याने आपणास संततीच्या प्रकृतीची थोडी काळजी घ्यावी लागेल.
तूळ हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपणास काही मानसिक त्रास होण्याची शक्यता असून आर्थिक विवंचना आपणास सतावत राहतील. निष्कारण काळजी केल्याने आपण स्वतःला त्रास करून घ्याल, तेव्हा काळजी करणे सोडा. प्रकृती बिघडण्याची शक्यता असल्याने आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल असून केलेले प्रवास आनंददायी ठरतील. नोकरीत कामाचा आनंद घेऊ शकाल. आपल्या कामाची प्रशंसा सुद्धा करण्यात येईल. व्यापार करणाऱ्या जातकांना आपल्या भागीदारांसह नवीन योजना आखाव्या लागतील. त्यामुळे आपली व्यापार वृद्धी होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल असून त्यांना काही चांगले अनुभव येतील.
वृश्चिक हा आठवडा आपल्यासाठी सामान्यच आहे. आपणास काही आंशिक स्वरूपाचे परिणाम मिळतील. आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या वैवाहिक जीवनाबद्धल आपण जागरूक राहून जोडीदारास खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल आठवड्याच्या मध्यास आपली काळजी वाढली तरी आठवड्याचे अखेरचे दिवस चांगले जातील. एखादा दूरवरचा प्रवास करू शकाल. नोकरीत सहकाऱ्यांशी गोड बोलून व त्यांच्याशी मिळून मिसळून काम करणे फायदेशीर होईल. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात सावध राहावे लागेल. आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. आपले आरोग्य सामान्य राहील. कौटुंबिक जीवन सामान्यच राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. त्यांना प्रेमालापाची संधी मिळेल. विवाहितांच्या जीवनात काही समस्या निर्माण होतील आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
धनु हा आठवडा आपणास सामान्य फले देणारा आहे. आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन आजारपण येऊ नये म्हणून आठवड्याच्या सुरुवातीपासून आपणास निष्कारण काळजी करण्यापासून दूर राहावे लागेल. आठवड्याच्या सुरुवातीस खर्चात वाढ होईल. मात्र, आठवड्याच्या मध्यापासून खर्च नियंत्रणात आल्याने काळजीस कारण उरणार नाही. खर्च कमी होऊन प्राप्तीत वाढ होऊ लागेल. व्यापारात लाभ होईल. नोकरीत चांगले परिणाम मिळाल्याने आपली स्थिती मजबूत होईल. विवाहितांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या नातेसंबंधांचा आनंद लुटू शकाल. कुटुंबियांच्या सहवासात आपणास वेळ घालवता येईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा आनंददायी आहे. आपल्या प्रियव्यक्तीस खूश ठेवण्यात आपण कमी पडणार नाही. हा आठवडा प्रवासास प्रतिकूल आहे.
मकर हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपण संततीवर प्रेमाचा वर्षाव कराल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. वैवाहिक जीवनातील जवळीक वाढेल. नात्याची वीण घट्ट झाल्याने आपण दोघे एकत्रितपणे अनेक कामे पूर्ण कराल. प्रेमीजनांच्या आयुष्यात सुरवातीस काही गैरसमज होऊन नात्यात थोडा दुरावा निर्माण होईल. दुरावा टाळण्यासाठी आपणास एकत्र बसून गैरसमज दूर करावे लागतील. आठवड्यात एकंदरीत सुखांचा वर्षाव होईल. नोकरीत चांगली कामगिरी होईल. व्यापाऱ्यांना व्यापारवृद्धीसाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपल्या प्रकृतीत मात्र सतत चढ - उतार येतील. ऋतुगत विकारांचा त्रास संभवतो. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. आठवड्यात नवीन मैत्री होईल.
कुंभ हा आठवडा सामान्य फले देणारा आहे. कुटुंबांशी संबंधित एखाद्या मोठ्या गोष्टीने आपला गैरसमज होईल. अशा परिस्थितीत आपणास योग्य निर्णय घ्यावा लागेल. निर्णय घेताना गरज भासल्यास एखाद्या त्रयस्थाची मदत आपण घेऊ शकता. प्रकृतीत चढ - उतार येण्याची शक्यता असल्याने आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. नोकरीत कामाचा आनंद घेऊ शकाल. आपली कामगिरी चांगली होऊ शकेल. मात्र सभोवतालच्या वातावरणाने आपण प्रभावित व्हाल व त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या कामगिरीवर होण्याची शक्यता आहे. व्यापारीवर्गासाठी हा आठवडा सामान्यच आहे. आपणास दूरवरच्या क्षेत्रातील व राज्यातील कार्यात यश प्राप्त होईल, मात्र कार्यालयात काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होतील. प्रेमीजनांना आपल्या प्रियव्यक्तीच्या नाराजीस सामोरे जावे लागेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
मीन हा आठवडा आपणास अत्यंत चांगली फले देणारा असल्याचे दिसत आहे. आपण अनेक आव्हानांना सामोरे जाऊन त्यांच्यावर मात करू शकाल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आपल्या कामात आपणास मदत करू शकेल असा एखादा नवीन मित्र आपल्याला भेटण्याची शक्यता आहे. आपल्या कामात मित्रांचे सहकार्य मिळू शकेल. नोकरीत कामाचा आनंद घेऊ शकाल. आपली कामगिरी चांगली झाल्याने आपण प्रशंसित व्हाल. असे असले तरी वरिष्ठांशी एखादा बेबनाव होऊ शकतो. व्यापारीवर्गासाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेमाने परिपूर्ण होईल. प्रेमीजन आपल्या प्रणयी जीवनातील काही गोष्टी आपल्या मित्रवर्गास सांगू शकतील. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होईल.