आठवड्याचे राशीभविष्य : 28 फेब्रुवारी ते 6 मार्च 2021, 'या' राशीसाठी आठवडा असणार शुभ; अचानक धनलाभ होणार, प्रतिष्ठा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 11:24 AM2021-02-28T11:24:16+5:302021-02-28T11:54:53+5:30

Weekly Horoscope 28 February to 6 March 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी असल्याने आव्हानांना घाबरून न जाता आपले कार्य चालूच ठेवा. आपल्या कुटुंबात सुख - शांती नांदेल. प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी आपणास थोडे प्रयत्न करावे लागतील. आपल्या प्रियव्यक्तीस एखादी भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करावे. नोकरी करणाऱ्यांना कामात यश प्राप्त होईल, मात्र कार्यालयातील एखाद्या व्यक्तीशी वाद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. व्यापारी वर्गास ह्या आठवड्यात चांगला फायदा झाल्याने ते आनंदित होतील. कुटुंबातील एखाद्या जुन्या संपत्ती विषयी विचार - विमर्श होईल. विद्यार्थ्यांचा कल फाईन आर्टस् ह्या विषयाकडे होईल. व त्यामुळे आपले छंद जोपासण्याची त्यांना संधी मिळेल. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा काहीसा नाजूक आहे. आपल्या आहाराकडे तसेच डोळ्यांकडे विशेष लक्ष द्यावे.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपण मानसिक दृष्ट्या बेचैन व्हाल. ग्रहस्थितीमुळे आपण आतूनच त्रस्त व्हाल. वैवाहिक जीवनात तणावाची स्थिती निर्माण होईल. आपल्या वागणुकीमुळे तणाव वाढेल. आपले आरोग्य नाजूक राहील. आपणास लहान - सहान फोड किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आपले प्रणयी जीवन सुखद असेल. आपल्या प्रियव्यक्तीसह एखाद्या रमणीय ठिकाणी आपण फिरावयास जाऊ शकाल. नोकरीत चांगली कामगिरी होईल. आपणास नशिबाची साथ मिळणार असल्याने आपले कार्य चालूच ठेवा. व्यापाराच्या बाबतीत आपली स्वतःची विचारसरणी असेल कि जी आपल्या भागीदारास कदाचित पसंत पडणार नाही. त्यामुळे आपल्या दोघात काही मतभेद होण्याची शक्यता आहे. आपले व्यावसायिक नुकसान होऊ नये म्हणून हि परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा.

हा आठवडा आपणास बरेच काही देणारा आहे. आपल्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आपल्या मान - सन्मानात वाढ होईल. लोक आपली प्रशंसा करतीलच व आवश्यक कामांसाठी आपला सल्ला घेण्यासाठी सुद्धा आपल्याकडे येतील. आपले आरोग्य उत्तम राहील वैवाहिक जीवनातील तणाव निवळू लागतील. सासुरवाडीकडील परिस्थितीत सुद्धा सुधारणा होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. ह्या आठवड्यात आपणास डोळ्यांकडे लक्ष द्यावे लागेल. डोळेदुखी किंवा डोळ्यास इजा संभवते. प्राप्ती थोडी कमी होईल व खर्च मात्र वाढतील. त्यामुळे आपणास आर्थिक नियोजन करावे लागेल. नोकरीत आपल्या कामाचे यथोचित फळ मिळेल. नशिबाची सुद्धा साथ मिळेल. व्यापारी वर्गास आपल्या व्यापार वृद्धीसाठी प्रतिष्ठित व्यक्तीचे सहकार्य मिळेल.

आठवड्याच्या सुरुवातीस नाते संबंधांमुळे आनंदाचे व जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण होईल. आपण आपल्या कुटुंबियांच्या सहवासात आनंदात वेळ घालवू शकाल. प्रणयी जीवनात सकारात्मक प्रगती होईल. आपल्या प्रेमाकर्षणात कोणत्याही प्रकारे अडथळे निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आठवड्यात कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर व शासकीय बाबीत आपले तर्क व संवादाच्या आधारे समाधान प्राप्त करू शकाल. आपल्या संवाद कौशल्याने आपल्या व्यावसायिक जीवनात चांगल्या परिणामांची अपेक्षा आपण बाळगू शकता. या दरम्यान आपणास वाईट संगती पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्या आठवड्यात आपल्या अनुभवाच्या जोरावर यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आठवड्याच्या मध्यापर्यंत विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता होऊ शकेल व ते आपल्या निर्धारित लक्ष्यांकाच्या जवळपास जाऊन पोचू शकतील. आठवड्यात आपल्या प्रकृतीत सकारात्मक सुधारणा होताना दिसून येईल.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. दरम्यान आपली इच्छा असून सुद्धा आपण जितके काम करू शकता तितके न करू शकल्याने आपणास आपल्या कौशल्याचा पुनर्विचार करावा लागेल. समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. आपल्या वरिष्ठांना आपली समस्या सांगा. त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांचा फायदाच होईल. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा चांगला आहे. वैवाहिक जीवनात प्रेम व जिव्हाळा राहील. आपला जोडीदार आपणास कामाच्या बाबतीत योग्य सल्ला सुद्धा देऊ शकेल. प्रेमीजनांना आपल्या प्रियव्यक्तीशी संवाद साधण्याची व त्यांना समजून घेण्याची आवश्यकता भासेल. तसे न केल्यास नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. ह्या आठवड्यात आपली प्राप्ती चांगली होईल. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आठवड्यात आपली प्रकृती चांगली राहील.

हा आठवडा आपल्यासाठी उत्तम असून सुरुवातीपासूनच आपण उत्साहित दिसाल व त्यामुळे प्रत्येक कामात आपणास यश प्राप्त होईल. आपण स्वतः आनंदित व्हालच शिवाय इतरांना सुद्धा त्यात सहभागी करण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक जीवनात खूपच आनंद पसरेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा उत्तम आहे. कुटुंबियांचे सुद्धा आपणास सहकार्य मिळेल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. प्रवासाची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांचा गुंता काही अंशी उलगडू शकेल. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा उत्तम आहे. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. आपण त्यामुळे चिंतीत होऊ शकता. आपली प्रकृती मात्र आता बऱ्याच अंशी सुधारू लागेल. जीवनाचा आनंद आपण उपभोगू शकाल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या खर्चात अचानकपणे वाढ होईल, व आपणास त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आठवड्याच्या मध्यास परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. आपला आत्मविश्वास वाढेल व त्यामुळे आपणास प्रत्येक कार्यात यश प्राप्त होईल. आठवड्याच्या अखेरीस आपणास कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. ह्या दरम्यान आपणास आर्थिक चिंता सतावतील. आपले आरोग्य चांगले राहिले तरी खाण्या - पिण्यातील असमतोलपणामुळे काही त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरणात आनंद पसरेल. आपण आपल्या जुन्या पिढीतील लोकांना भेटून आनंदित व्हाल , तसेच त्यांच्याकडून बरेच काही शिकून घ्याल. वैवाहिक जीवनातील गोडवा टिकून राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या घरात एखाद्या पूजेचे आयोजन करू शकाल. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल आहे.

हा आठवडा आपल्यासाठी आशादायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण आपल्या कामावर पूर्ण लक्ष द्याल व त्यामुळे कुटुंबियांना अपेक्षित असा वेळ आपण देऊ शकणार नाही. परंतु कामातील आपली प्रगती बघून प्रशंसा व पदोन्नती अशा दोन्ही गोष्टी आपणास मिळू शकतील. आठवड्याच्या मध्यास आपल्या प्राप्तीत भरघोस वाढ होईल. आजवर आपण जे कष्ट केलेत त्याचे चीज होईल. आठवड्याच्या अखेरीस खर्चात वाढ होताना दिसून येईल, व त्यामुळे आपण काहीसे चिंतीत होण्याची शक्यता आहे. आपले आरोग्य चांगले राहील. आपला वैवाहिक जोडीदार काही कारणाने क्रोधीत होण्याची किंवा चिडचिडी होण्याची शक्यता असून त्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपल्या नात्याची वीण घट्ट करण्यासाठी त्यांना आठवड्याच्या मध्यास चांगली संधी मिळू शकेल.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस एखादा मोठा निर्णय घेणे आपल्यासाठी फायदेशीर होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यास आपली सर्व कामे पूर्ण होतील. आपल्या मान - सन्मानात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठेत भर पडेल. वरिष्ठ आपली प्रशंसा करतील. व्यापारात तेजी येईल. विवाहितांना अनेक जवाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. आपण एकमेकांना समजून घेऊन नात्यात गोडवा निर्माण कराल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. मात्र, आपल्या शत्रूंच्या कारवाया वाढतील. आपले शत्रू आपल्या नात्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतील. आपणास आपल्या मित्रांकडून काही लाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल. आपले आरोग्य उत्तम राहील. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरुवातीस काही चिंता आपणास सतावतील, मात्र आपण जर पूर्ण आत्मविश्वासाने कार्य केलेत तर चांगला परिणाम मिळवू शकाल. कामाच्या बाबतीत आपण आपल्या लक्ष्यांकावर नजर ठेवून असाल. नोकरीत कष्टाचा पूर्ण फायदा होईल. आपण आपल्या कामाचा आनंद घेऊ शकाल. व्यापारात सुद्धा वृद्धी होईल. आपला व्यावसायिक भागीदार आपल्या खांद्यास खांदा देऊन आपले समर्थन करेल. वैवाहिक जोवनात आनंद पसरेल. प्रेमीजनांसाठी मात्र हा आठवडा काहीसा त्रासदायी आहे. एकमेकांप्रती कटुता वाढू शकते. अशा परिस्थितीत आपणास शांत राहून धीराने पुढे जावे लागेल. आवश्यकता भासल्यास एखाद्या त्रयस्थाची मदत घेऊन आपले प्रणयी जीवन पूर्ववत करावे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण आपल्या व्यक्तिगत जीवनाचा भरपूर आनंद लुटू शकाल. विवाहितांच्या जीवनात आनंद पसरेल. आपल्या जीवनात प्रेम भरलेले असेल. जोडीदारासह बाहेर फिरावयास जाण्याची योजना आखू शकाल. प्रेमीजनांना आपल्या प्रियव्यक्तीचे हृदय जिंकण्यात यश प्राप्त होईल. नात्यात सुधारणा होऊन आपलेपणा वाढेल. जवळीक वाढेल. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे आपल्या चिंतेत भर पडेल. खर्चात वाढ होईल. प्राप्तीत सुद्धा वाढ होऊ लागेल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. आठवड्यात एखादा कौटुंबिक वाद संपुष्टात आणण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च कराल.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपणास आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आठवड्याच्या सुरुवातीपासून एखाद्या गोष्टीमुळे आपण चिंतीत होऊ शकता. प्राप्ती सामान्यच राहील. मात्र, खर्चात वाढ होईल, ज्यावर आपणास गंभीरतेने विचार करावा लागेल. आर्थिक नियोजन करणे हितावह ठरेल. आठवड्याच्या मध्यास चांगली प्राप्ती होईल. व्यापारात उन्नती होईल. आपल्या व्यावसायिक भागीदारामुळे आपणास मोठा फायदा होऊ शकेल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामात तल्लीन व्हावे लागेल. तसे केल्यानेच आपली कामगिरी उत्तम होऊ शकेल. नशिबाची साथ मिळाल्याने कामात यश प्राप्त होईल. कुटुंबातील एखाद्या लहान व्यक्तीची प्रकृती बिघडू शकते. त्यांची काळजी घ्यावी. वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. प्रेमीजनांना काही चांगली बातमी मिळू शकेल. आपण आपल्या प्रियव्यक्तीस विवाहासाठी मागणी घालू शकाल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.