आठवड्याचे राशीभविष्य : 28 मार्च ते 3 एप्रिल 2021, 'या' राशीच्या लोकांनी करू नका पैशाचे व्यवहार अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 01:46 PM2021-03-29T13:46:15+5:302021-03-29T14:00:01+5:30

Weekly Horoscope 28 March to 3 April 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

या सप्ताहाच्या सुरुवातीचा काळ खूप अनुकूल आहे. त्यामुळे महत्वाची कामे करण्याची घाई करा, शेवटी शेवटी कामे प्रलंबित ठेवू नका. कल करे सो आज, आज करें सो अब हे लक्षात ठेवा, महिलांना शारीरिक त्रास होऊ शकतो. थोडा आराम करा. दगदग, धावपळ बंद करा. मुलांना नोकरी बदलण्याची इच्छा असेल तर हरकत नाही. प्रयत्न करा. यश मिळेल. नातेवाईक आणि जवळच्या लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे. वोलताना काळजी घ्या. व्यवसायात माल भरणे, वसुलीसाठी प्रयत्न करणे ही कामे पहिल्या तीन दिवसांत करा. टीप मंगळवार, बुधवार व शनिवार चांगले दिवस.

घरातील वाद टाळा पती- पत्नी यांनी एकमेकांना सांभाळून घ्यावे. छोट्या- छोट्या गोष्टी वाद वाढवू शकतात. गैरसमज करून घेऊ नका, व्यापारात आर्थिक व्यवहार खूप काही होणार नाहीत. एखाद्या यळेस नुकसान होऊ शकते. त्यामुळे उलाढाल करताना सांभाळून राहावे. महिलांच्या पदरी वाईटपणा येऊ शकतो. कितीही खस्ता खाल्ल्या तरी कुणाला आपली कदर नाही, अशी भावना मनात घर करेल. मुलांना परीक्षेचा ताण येईल. त्यांनी अभ्यासाचा आढावा घेणे आवश्यक आहे. टीप - रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस आहेत.

तब्येतीची काळजी घ्या खाण्या- पिण्याकडे नीट लक्ष द्या. ज्यांना पथ्यपाणी सांगितलेले आहे त्यांची हेळसांड करू नका. कदाचित आरोग्याचा त्रास होईल. उद्योग व्यवसायात सरकारी बंधने येतील. ती पाळणे आवश्यक असेल. सरकारी कार्यालयात कामे करणान्यांना चांगला काळ आहे. फायद्यात राहाल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. महिलांना सामाजिक उपक्रमात सहभागी होता येईल. चांगले अनुभव येतील. नाव होईल. मुलानी पैशाचे नियोजन करावे. टीप - सोमवार, मंगळवार आणि शनिवार चांगले दिवस आहेत.

आर्थिक लाभ होईल. अडकलेले पैसे मिळतील. जे पैसे मिळायेत यासाठी वन्याच दिवसांपासून वाट पाहत होतात ते तुमच्या खात्यात जमा होतील, व्यवसायात सामान्य स्थिती राहील. हा काळ पण जाईल, निराश होऊ नका. महिलांना कष्टाचे फळ मिळेल, अर्थात किती मिळाले म्हणजे आपल्याला समाधान वाटेल हे ज्याच्या त्याच्या मानण्यावर अवलंबून असते. समाधान हे सापेक्ष असते. मुलांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

खर्चावर नियंत्रण ठेवा. या आठवड्यात आपल्याला खर्चिक स्वभावाला आवर घातला पाहिजे. उधान्य वाढवू नका. हातात आलेले पैसे जपून खर्च करा. अनावश्यक खर्च करू नका, उद्योग व्यवसायात चांगला फायदा होईल. त्यामुळे व्यापारी आनंदात असतील, कामे वेळच्या वेळी केलेली केव्हाही चांगली. विविध विले, क्रेडिट कार्डची विले मुदतीच्या आत भरणे आवश्यक आहे. केवळ दिरंगाईमुळे दंड भरणे योग्य नाही. महिलांचे अंदाज खरे ठरतील. मुलांना नीट निर्णय घेता येणार नाहीत. टीप - सोमवार, मंगळवार व बुधवार चांगले दिवस.

जास्त धाडस दाखवू नका. कोणतेही अनिश्चित असे काम करू नका. अंदाज पंचे दाहो दरसे' हे धोरण उपयोगाचे नाही. उद्योग व्यवसायात परिस्थितीप्रमाणे बदल करा. हेकेखोरपणा कामाचा नाही, तसेच आपले स्वतःचे मत पण महत्त्वाचे असते हे विसरू नका, ' गंगा गए गंगादास. मथुरा गए मथुरादास' असा लेचेपेचेपणा कामाचा नसतो. महिलांना स्वतः चे कर्तृत्व दाखवता येईल. मुलांना अभ्यासात अडचणी येतील, मात्र जाणकारांचा सल्ला घेऊन त्या अडचणी दूर करता येतील. पालकांना पण आपल्या समस्या सांगू शकता.

कागदोपत्री कामे पुढे ढकला. कागदोपत्री पूर्तता करण्याची कामे सध्या करू नका. ही कामे काही दिवस पुढे ढकला. व्यवहार जरी फायद्याचा दिसत असला तरी नंतर कटकटी होऊ शकतात. जमीन, पर किया प्रॉपर्टी नोंदणीची कामे सध्या करू नका. व्यवसायात आर्थिक लाभ होईल. चार पैसे खिशात खुळखुळतील. आपण मित्रमंडळीवर पैसे उडवू नका. तसेच कुणाच्या तरी प्रभावाखाली येऊन खर्च वाढवू नका. लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तिचा मान पण राखावा लागतो. महिलांना मिश्र फळ देणारा काळ आहे. मुलांना व्यवसायात लाभ होईल.

नोकरीत बढती मिळेल ज्यांना नोकरी बदलण्याची इच्छा आहे, त्यांचे इरादे यशस्वी होतील, नवीन नोकरी मनासारखी मिळून त्यात वाढीव पगार मिळेल. आहे त्या नोकरीत पण बढती आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. मुलांनी धाडसाचे काम हाती घेण्यास हरकत नाही. त्यासाठी माहिती गोळा करून योजना आखायला हरकत नाही. व्यापाऱ्यांना विविध शासकीय योजना, सवलती, सूट यांचा लाभ होईल. महिलानी हुशारीने कामे करून घेतली पाहिजेत. आपले महत्त्व कसे वाढेल याकडे पण महिलांना लक्ष द्यायला हवे.

स्पष्ट भूमिका लाभ देईल. आपण या सप्ताहात रोखठोकपणे वागा. आपली भूमिका कुठल्याही परिस्थितीत गुळमुळीत ठेवू नका. स्पष्टपणे बोला. तेच तुमच्या हिताचे ठरेल. छोट्या व्यापाऱ्यांना फायदा देणारा काळ आहे. फार मोठ्या उलाढाली करणाऱ्या व्यावसायिकांना मात्र नुकसान होऊ शकते. म्हणून त्यांनी सावधपणे व्यवहार करावेत हे बरे. महिलांना आठवड्याच्या अखेरचा काळ फायदा देऊन जाईल, मुलांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.

व्यवसायात पैसे टाकू नका, व्यापारीवर्गाला सध्याचा काळ फार प्रगतीचा दिसत नाही. आपला प्रगतीचा आलेख स्थिर ठेवण्यावर भर द्यावा, व्यवसायात आर्थिक गुंतवणूक न केलेली वरी, उगाच पैसे अडकून पडतील, महिलांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल, मात्र त्यांनी स्वतः चे महत्व कमी होणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे. ज्या महिला छोटे उद्योग, गृह उद्योग चालवतात त्यांना व्यवसायात यश मिळेल. या सप्ताहात या ना त्या कारणाने मिष्टान्न भोजनाचे योग आहेत. मुलांना शिष्यवृत्ती किया रोख पुरस्कार मिळू शकतात. प्रवासाचे पण योग आहेत. टीप

कर्जाचे काम होईल : आपण जर व्यवसाय किया घरासाठी कर्ज मिळावे यासाठी प्रयत्न करीत असाल तर ते काम होईल, व्यवसाय, उद्योगात काही अडचणी समोर उभ्या राहतील. मात्र आपण आपली मनाची एकाग्रता आणि सकारात्मकता विचलित होऊ देऊ नका. काही घरात वादाचे प्रसंग येतील, अशा वेळी कुटुंबप्रमुखाचे म्हणणे ऐकणे यातच सर्वांचे भले असेल. महिलांना घरातच व्यस्त राहावे लागेल असे दिसते. मुलांना करिअर बाबत निराशा वाटेल. मात्र त्यांनी तज्ज्ञांशी चर्चा करावी, काही नवीन माहिती मिळते का ते पण बघायला हवे, टीप- मंगळवार, बुधवार आणि गुरुवार चांगले दिवस.

घरात मंगलकार्य ठरेल ज्या घरात उपवर मुली, मुले असतील तेथे आनंदाची बातमी कळेल. लग्नकार्य ठरेल. त्यामुळे घरात लगबग दिसून येईल, उत्साहाचे वातावरण राहील. व्यवसायात परिस्थिती सामान्य असेल, जे आहे तसेच चालू द्या. व्यापारात सध्या फार मोठे निर्णय घेऊ नका. मुलांना तब्येतीचा त्रास होईल. त्यामुळे त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, कारण नसताना भटक नका. पालकांनी पण मुलांकडे लक्ष द्यायला हवे. महिला जास्त काम हाती घेतील, त्यामुळे त्या खूप व्या राहतील.