आठवड्याचे राशीभविष्य : 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ लाभल्याने यश मिळेल, सन्मान वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 10:07 AM2021-09-01T10:07:00+5:302021-09-01T10:10:01+5:30

Weekly Horoscope 29 August to 4 September 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

हा आठवडा आपल्यासाठी धनदायी आहे. अर्थात धन प्राप्ती म्हणजेच सर्व काही नाही. आपणास आपल्या वाढीव खर्चांवर सुद्धा लक्ष ठेवावे लागेल. आपण खूप खरेदी कराल, ज्यात महागड्या टी. व्ही. चा समावेश सुद्धा असू शकतो. कुटुंबात काही तणाव असल्याचे दिसून येईल, मात्र आपण कुटुंबा ऐवजी आपल्या स्वतःवर जास्त लक्ष द्याल. त्यामुळे आपले कुटुंबीय काहीसे नाराज होण्याची शक्यता आहे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी विशेष चांगला नाही. आपणास आपल्या प्रिय व्यक्तीच्या क्रोधास सामोरे जावे लागू शकते. आपण जर आपली चूक मान्य केलीत तर शक्य आहे कि आपल्या प्रिय व्यक्तीचा राग मावळून ती आपणास क्षमा करेल. असे करणेच आपल्या हिताचे असेल. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात काही नवीन विचार समजून घेण्याची संधी मिळेल. आपला वैवाहिक जोडीदार त्याच्या बुद्धिमत्तेचा परिचय आपणास करून देईल. आपले आरोग्य उत्तम राहणार असले तरी अति क्रोधा पासून दूर राहावे.

हा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. ह्या दरम्यान आपण स्वतःला मानसिक दृष्ट्या कमकुवत समजू लागाल. एखादा मोठा निर्णय घेण्यास आपण अनिच्छुक असाल. असा निर्णय घेणे किती हि अवघड वाटत असले तरी सुद्धा जीवनात प्रगती साधण्यासाठी त्याची आवश्यकता असल्याची जाणीव आपणास ठेवावी लागेल. अशा वेळेस गरज भासल्यास एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. ह्या आठवड्यात कौटुंबिक तणाव काही अंशी कमी होतील. संपत्तीशी संबंधित बाबीत आपणास लाभ होईल. व्यापार वृद्धी होईल. नोकरीतील कामगिरी चांगली होईल. नोकरीत आपल्यावर असलेला दबाव आता संपुष्टात येईल. आपण मोकळेपणाने काम कराल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात वेळ घालविण्यासाठी त्यांच्यासह चित्रपट बघण्याची किंवा खरेदीस जाण्याची संधी सुद्धा मिळेल. ह्या दरम्यान आपले नाते अधिक दृढ होईल. वैवाहिक जीवनात आपल्या तणावामुळे परिस्थिती काहीशी बिघडू शकते, अन्यथा हा आठवडा वैवाहिक जीवनासाठी चांगलाच आहे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. ह्या आठवड्यात आपण अत्यंत रोमँटिक असल्याचे दिसून येईल. आपल्या प्रणयी जीवनात आपण खूप मजा कराल. आपल्यात प्रेमालाप होईल. एकमेकांच्या सहवासात भरपूर वेळ घालवू शकाल. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी महागडे घड्याळ घेऊ शकाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली तरी आपल्या वैवाहिक जोडीदारास एखादे आजारपण येण्याची शक्यता असल्याने आपणास त्याची काळजी घ्यावी लागेल. आपली स्वतःची प्रकृती चांगली राहील. कुटुंबातील आपल्या वाढत्या हस्तक्षेपामुळे कौटुंबिक वातावरण गढूळ होऊन वाद वाढू शकतात. मार्केटिंगशी संबंधित जातकांसाठी हा आठवडा खूप मोठा फायदा मिळवून देणारा आहे. आपले लक्ष्यांक वेळेपूर्वी पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना एखादा मोठा सौदा झाल्याने खूप आनंद होईल. आपणास कार्यात यश प्राप्तीसाठी थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील. ह्या आठवड्यात आपले आरोग्य उत्तम राहील.

आठवड्याच्या सुरवातीस आपण नात्यांना अधिक महत्व द्याल. संततीशी संबंधित एखादी समस्या असल्यास त्याचे निराकरण होण्याची संभावना आहे. जस जसे दिवस पुढे सरतील तस तसा आपल्या प्रेमाचा मोह भंग होऊ लागेल. आठवड्याचा उत्तरार्ध आपल्यासाठी काहीसा कठीण असल्याचे दिसत आहे. ह्या दरम्यान आपल्या ऊर्जेचे स्तर कमी होईल. तसेच सतत प्रकृतीत होणाऱ्या बदलामुळे आपण चिंतीत व्हाल. कामाच्या ठिकाणी अनेकदा आपल्या उग्रतेमुळे वादाची ठिणगी पडू शकते. ह्या आठवड्यात कोणत्याही प्रकारे नवीन संधी मिळण्याची संभावना कमी असल्याचे दिसत आहे. आठवड्याच्या अखेरीस आपली आर्थिक स्थिती डळमळीत होण्याची शक्यता असून आपणास अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. आपणास आर्थिक देवाण - घेवाण करताना अत्यंत सावध राहावे लागेल. धीर धरूनच आपण अवघड परिस्थितीतून बाहेर पडू शकाल.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत शुभ फलदायी आहे. आपल्यात भरपूर आत्मविश्वास असल्याचे दिसून येईल. आपल्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या कडून ऊर्जा प्राप्त करेल. संपत्तीशी संबंधित कामात चांगला लाभ होईल. आपण एखादी नवीन संपत्ती बनवू शकाल किंवा खरेदी करू शकाल. कोर्ट - कचेरीतील कामात यश प्राप्त होईल. आपण विरोधकांवर मात करू शकाल. व्यापारात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या जातकांची त्यांच्या कौशल्यामुळे चांगली कामगिरी होऊ शकेल. कुटुंबात एखादे शुभ कार्य होईल. एखाद्या व्यक्तीच्या विवाहाची तयारी संभवते. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला असून आपण आपल्या प्रिय व्यक्तीची कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींशी ओळख करून देऊ शकाल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आपल्या प्रिय व्यक्तीस प्राप्त होऊ शकेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आपणास सासुरवाडी कडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीसच आपणास एखादा मोठा लाभ संभवतो. व्यापारात आपल्या योजना गती घेतील व त्याचे परिणाम आपणास अनुकूल असतील. त्यामुळे आपले आत्मबल वाढेल. आपल्या पैकी काहीजण परदेशात जाण्यात यशस्वी होतील. तसेच त्यांच्या काही योजना यशस्वी होतील. परदेशातील कामगिरी उत्तम होईल. काही जातक परदेशी सरकारच्या सहकार्याने कामे करून आपले जीवन उंचावतील. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी अनुकूल आहे. चांगले संपर्क असल्याने व्यापारात सुद्धा लाभ होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्यच आहे. आपली प्रिय व्यक्ती सतत आपले लक्ष वेधून घेईल. विवाहितांना काळजी करण्या सारखे काही नाही. नात्यात रोमांस राहील. एकमेकांप्रती आपण आकर्षित झाल्याने आपल्यातील जवळीक वाढेल. सासुरवाडी कडील लोकांच्या सहवासात प्रवास करण्याची संधी मिळेल.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्यच आहे. आठवड्याच्या सुरवातीस विनाकारण चिंता करून चांगली संधी आपण गमावून बसण्याची शक्यता आहे. चिंतामुक्त होऊन जीवनातील सत्य समजून घेणे आपल्याच हिताचे होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. प्राप्तीत खूप मोठी वाढ होईल. आपणास शासना कडून सुद्धा काही फायदा होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. नात्यातील प्रेम वृद्धिंगत होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चढ - उतारांचा आहे. समस्या आल्या तरी आपण नाते दृढ करण्याचा प्रयत्न कराल. व्यापाऱ्यांना एखाद्या नवीन स्पर्धकाचे आव्हान स्वीकारावे लागू शकते.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या व्यापारावर अधिक लक्ष केंद्रित करून काही नवीन योजना तयार कराल. दूरवरच्या क्षेत्रात आपल्या व्यापाराच्या वृद्धीसाठी एखाद्या नवीन युक्तीच्या वापराने आपणास खूप फायदा सुद्धा होऊ शकेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा काही चमत्कार घडविणारा आहे. आपणास बिघडलेल्या परिस्थितीतून बाहेर पडून आपल्या कामात प्रगती करण्याची संधी मिळेल. आपण सर्वांवर मात करू शकाल व त्यामुळे आपला दबदबा टिकून राहील. आपली प्रतिमा मजबूत होऊन आपल्या कार्यभारात सुद्धा वाढ होईल. आपली प्रकृती उत्तम राहील. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. प्रणयी जीवनात आनंद पसरेल. सामाजिक माध्यमांच्या मदतीने आपण आपल्या प्रिय व्यक्तीस प्रेमळ संदेश पाठवून प्रणयी जीवनाचा आनंद घेऊ शकाल. विवाहितांच्या जीवनात चढ - उतार येतील. आठवड्याचे शेवटचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपले आरोग्य बिघडण्याच्या शक्यतेमुळे आपणास त्याची काळजी घ्यावी लागेल. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या खर्चात वाढ झाली तरी मध्यास त्यात कपात होणार असल्याने काळजी करू नये. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा अत्यंत चांगला आहे. आपणास आपल्या चांगल्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. आपले वरिष्ठ सुद्धा आपली प्रशंसा करतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. ते कामाचा आनंद घेऊ शकतील. विवाहितांसाठी हा आठवडा आव्हानात्मक आहे. वैवाहिक जोडीदाराशी वाद संभवतात. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. एकमेकांना समजून घेण्यासाठी आपणास आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात थोडा जास्त वेळ घालवावा लागेल. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल असल्याने शक्यतो प्रवास टाळावा.

ऑगस्ट महिन्यातील अखेरचा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यांची बुद्धी तेज असल्याने ते इतर कामावर आपले लक्ष केंद्रित करतील जे त्यांच्या अध्ययनासाठी घातक ठरू शकते. प्रणयी जीवन सामान्यच राहील. विवाहितांचे जीवन मात्र सुखद होईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष देऊन त्यांच्यासाठी चांगले कपडे खरेदी करू शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामात चांगले परिणाम मिळतील. नशिबाची साथ मिळाल्याने आपणास कामात यश प्राप्त होईल. आपला सन्मान वाढेल. पदोन्नती संभवते. व्यापाऱ्यांना प्रयत्न वाढवूनच यश प्राप्ती होऊ शकेल. आठवड्याचा उत्तरार्ध प्रवासासाठी अनुकूल आहे.

ऑगस्ट महिन्यातील अखेरचा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण कौटुंबिक गरजांकडे लक्ष देऊन कुटुंबियांचे म्हणणे ऐकून घ्याल. त्यामुळे त्यांच्या मनातील आपल्या बद्धलचा आदर वाढेल. आपण सुद्धा आपली कर्तव्ये पार पाडू शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपणास मोठी पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांच्या नजरेत आपली प्रतिमा उंचावेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी यशदायी आहे. आपण आपल्या कामाचा आनंद घेऊ शकाल. तसेच आपल्या व्यापार वाढीसाठी कठोर परिश्रम सुद्धा कराल. आपले आरोग्य उत्तम राहील. आपण विरोधकांवर मात करू शकाल. प्राप्तीत वाढ होईल. खर्चात कपात होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी उत्तम आहे. आपल्या नात्यात रोमांस व आपलेपणा वाढून जवळीक निर्माण होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखादा प्रवास करू शकता. ह्या आठवड्यात आपले मित्र किंवा नातेवाईक आपला फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. ह्या आठवड्यात कोणालाही उसने पैसे देऊ नये. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आपसातील संवाद वाढतील. नात्यातील समस्या दूर होऊन रोमांस वाढेल. एकमेकांशी जवळीक वाढेल. आपण जर एखादे काम आपल्या वैवाहिक जोडीदारासह करत असाल तर त्यात आपणास यश प्राप्त होईल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या नात्यातील मोठेपणा जपून ठेवाल. व्यापारात यश प्राप्ती होईल. व्यापारीवर्गास शासनाकडून फायदा होऊ शकतो. स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगला परिणाम मिळेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.