आठवड्याचे राशीभविष्य : 5 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2021; 'या' राशीच्या व्यक्तींनी घेऊ नये मोठा निर्णय, अत्यंत सावध राहण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 09:43 AM2021-09-07T09:43:05+5:302021-09-07T10:01:21+5:30

Weekly Horoscope 5 September to 11 September 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपणास काही तांत्रिक काम करण्याची इच्छा होईल. तसेच तांत्रिक शिक्षणात आपली गोडी वाढेल व त्या संबंधीच्या पुस्तकांचे वाचन सुद्धा आपण कराल. मनोरंजनात सुद्धा आपण भरपूर वेळ घालवाल व नवीन गाणी ऐकण्यास सुद्धा आपले प्राधान्य असेल. ह्या आठवड्यात आपण एखाद्या कडून उसने पैसे घेऊ शकाल, व त्यामुळे आपणास आपल्या काही इच्छा दाबून ठेवाव्या लागतील. आपली प्राप्ती ठीकच असेल, परंतु एखादी मोठी गरज आपणास कर्ज काढण्यासाठी भाग पाडू शकते. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी प्रतिकूल आहे. विवाहितांसाठी मात्र हा आठवडा उत्तम आहे. वैवाहिक जोडीदाराशी परदेशात जाण्या संबंधी चर्चा करू शकाल. नोकरीत आपले मन रमणार नाही. नोकरीत बदल संभवतो. हा आठवडा व्यापाऱ्यांना आपल्या व्यापाराचा विस्तार करण्यासाठी अनुकूल आहे.

हा आठवडा आपल्यासाठी आव्हानात्मक आहे. आपणास आपल्या कुटुंबियांच्या गरजा व समस्यांवर अधिक लक्ष द्यावे लागल्याने त्याचा परिणाम आपल्या व्यावसायिक जीवनावर होण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनात समतोल साधणे आपल्यासाठी आव्हानात्मक असेल. आपणास आपल्या कार्यक्षेत्रात अधिक प्रयत्न करावे लागतील व कदाचित आवश्यकता भासल्याने ज्यादा काम करून स्वतःची गाडी रुळावर आणावी लागेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. ह्या दरम्यान आपला व्यावसायिक भागीदार सुद्धा मदतरूप होईल. एखादी सरकारी निविदा प्राप्त करण्यात यश मिळू शकेल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा चांगला असून आपण वेळेचा आनंद घेऊ शकाल. आपल्या प्रिय व्यक्तीस एखादी मोठी भेटवस्तू सुद्धा देऊ शकाल. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊन तणाव कमी होईल. आपल्या वैवाहिक जोडीदारासह बाहेर फिरावयास जाण्याची योजना आखाल. आपले आरोग्य उत्तम राहील. आपला आत्मविश्वास वाढेल. आपल्या संततीच्या प्रगतीने आपण आनंदित व्हाल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढल्याने मेहनत करून प्रगती साधण्यास त्यांना मदत होईल.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्या अपेक्षेनुसार फलप्राप्ती झाल्याने आपण आनंदित व्हाल. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखादा दूरवरचा प्रवास करू शकाल. ह्या प्रवासाची योजना आपण खूप पूर्वी पासून केली असल्याने आपणास त्याच्या प्रति अत्यंत विश्वास असेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा निष्काळजीपणा आपल्यासाठी त्रासदायी ठरण्याच्या शक्यतेमुळे कुटुंबात काही वाद होण्याची संभावना आहे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी खूपच चांगला आहे. त्यांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात फिरावयास जाण्याच्या अनेक संधी मिळतील व त्यामुळे त्यांना अधिकाधिक वेळ आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात थोडी बेचैनी वाढेल. विनाकारण ताण वाढल्याने आपले कौटुंबिक वातावरण गढूळ होऊ शकते. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कष्टांचे यथोचित फल मिळेल, परंतु काही विरोधकांच्या हस्तक्षेपामुळे आपणास काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यापाऱ्यांना आर्थिक गुंतवणूक करताना थोडी काळजी घ्यावी लागेल. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या काहीसा नाजूकच आहे.

आठवड्याच्या सुरवातीस कामा निमित्त आपली घाई होईल. आपण आपले विचार आपल्या सभोवतालच्या लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न कराल. आपणास आपले नाते संबंध जपण्याची काळजी घ्यावी लागेल. विशेषतः हा आठवडा आपल्या प्रणयी जीवनात अडथळे निर्माण करणारा असून आपल्या नात्याची कठोर परीक्षा घेणारा आहे. हा आठवडा अत्यंत संवेदनशील असून आपल्या नात्यातील विविध पैलू गंभीरपणे समजून घेण्यास आपणास भाग पाडेल. ऋतू बदलाचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. आपल्या स्थितीत हळू हळू सुधारणा होईल. आठवड्याच्या अखेरीस आपण कारकिर्दीत उन्नती करण्यासाठी प्रयत्न कराल. उत्तरार्धात आपणास काही लाभ होण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात व्यावसायिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी प्रवास होऊ शकेल.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अधून मधून ताप किंवा डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. आपल्या मनातील विचार बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. वेळोवेळी प्राणायाम करत राहा. त्यामुळे मन शांत राहील. असे असले तरी एखाद्या गोष्टीमुळे आपला संताप होण्याची शक्यता आहे. हा संताप आपल्या वैवाहिक व कौटुंबिक जीवनासाठी त्रासदायी होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी चांगला आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीस विवाहासाठी तयार करू शकाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. आपणास प्रशासनाचे सहकार्य सुद्धा मिळू शकेल व त्यामुळे आपल्या व्यापारास गती येऊन त्याची प्रगती होऊ शकेल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या नोकरीत चांगले फल मिळेल. एखादे विशेष बक्षीस किंवा बोनस मिळाल्याने आपली आर्थिक बाजू भक्कम होईल. खर्चात कपात होईल. आठवड्याचा उत्तरार्ध प्रवासासाठी अनुकूल आहे.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपण हजर जवाबी राहाल. आपल्यातील हास्य भावना तीव्र होईल. ह्या आठवड्यात लोकांना आपलेसे करण्यात आपण यशस्वी व्हाल. असे असले तरी अधून मधून अचानकपणे आपण काही कटू शब्द उच्चाराल जे लोकांच्या काळजास भिडेल. अशा परिस्थितीत आपणास आपला व्यवहार व वाणी ह्यावर लक्ष ठेवावे लागेल. वैवाहिक जीवन सामान्यच राहील, त्यात कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या नात्यात प्रगती करू शकाल. आपल्या कामात कुटुंबीयांची मदत होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कष्टांच्या प्रमाणात चांगले परिणाम मिळतील. व्यापारात चढ - उतार येतील. आपला एखादा स्पर्धक आपल्या विरुद्ध अशी एखादी योजना आखेल कि त्यामुळे आपणास पुनर्विचार करावा लागेल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपण आपल्या नोकरीवर लक्ष केंद्रित करून काम कराल. त्यामुळे आपणास कामात यश प्राप्त होईल व आपली प्रशंसा सुद्धा केली जाईल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना थोडी काळजी घ्यावी लागेल. शासनाकडून काही नवीन नियमावली येण्याची शक्यता असून त्याचा परिणाम आपल्या व्यापारावर होण्याची संभावना आहे. आपली प्रकृती चांगली राहील. आपण हौस मौज करण्यासाठी बराचसा पैसा खर्च करू शकाल, त्यावर नजर ठेवावी लागेल. प्राप्ती सामान्यच राहील. प्रणयी जीवन सामान्य असले तरी आपल्या प्रिय व्यक्तीच्या कुटुंबियां कडून एखादी समस्या निर्माण केली जाऊ शकते. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आपणास सामाजिक माध्यमांच्या मदतीने विदेशी मित्र बनविण्यात यश प्राप्त होईल.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस नशिबाची साथ मिळाल्याने आपली बरीचशी कामे होतील. नोकरीत वेळ चांगला गेल्याने आपणास कामात मजा येईल व कामावरील आपली पकड मजबूत होईल. व्यापाऱ्यांचा सुद्धा मोठा फायदा होईल. आपली खोळंबलेली कामे नशिबाच्या जोरावर पूर्णत्वास जातील. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. खर्चात कपात होईल. आपण प्रसन्न राहाल. वैवाहिक जीवन सामान्यच राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीसह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकाल. आपल्या प्रिय व्यक्तीसह एखादा चित्रपट बघण्यास जाऊन आपला वेळ आनंदात घालवू शकाल. आपले आरोग्य उत्तम राहील. कुटुंबियांच्या गरजा आपण पूर्ण करू शकाल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपले संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आठवड्याच्या सुरवातीस कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. आठवड्याचे मधले दिवस उत्तम आहेत. आपल्या मान - सन्मानात वाढ होईल. आपले कष्ट व आपली बुद्धिमत्ता आपल्या खूप उपयोगी येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. ह्या दरम्यान आपले वडील एखादी मोठी सिद्धी प्राप्त करू शकतील. आपणास सुद्धा नोकरीत चांगले परिणाम मिळतील व त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल. आपले वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपणास अनुकूल फल प्राप्त होईल. प्रकृतीत सुधारणा होईल. धार्मिक कार्यात पुढाकार घ्याल. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला तरी आनंदाचे क्षण सुद्धा अनुभवास येतील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा उत्तम आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपणास शारीरिक थकवा व अशक्तपणा जाणवेल. अशा स्थितीत जास्तीत जास्त पाणी प्यावे. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजी राहू नये. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपली कामे यशस्वी होतील. व्यापाऱ्यांचा सरकारी सूट मिळाल्याने काही फायदा होईल, मात्र आपल्या काही चुका सरकारी क्षेत्रा कडून नुकसान सुद्धा करू शकेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. नात्यातील आपलेपणा आपणास सुखद अनुभव देईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी खूपच चांगला आहे. ह्या आठवड्यात एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊ शकाल. रोमांस वाढेल. प्रकृती उत्तम राहील. आठवड्याचे सुरवातीचे व अखेरचे दोन दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

शिक्षक दिना पासून सुरु होत असलेला हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्यात सुद्धा एक शिक्षक आहे. आपण त्यास बाहेर काढण्याचा प्रयत्न कराल व काही लोकांना उपयोगी पडतील अशा गोष्टी शिकवाल. काही लोक त्याने प्रभावित होतील. आपला व्यापार सुद्धा वाढेल. आपली प्रतिमा उज्वल होईल. आपल्या लोकप्रियतेचा आलेख उंचावेल. नोकरी करणारे जातक कामाचा आनंद घेऊ शकतील. आपल्या कामात आपणास चांगले परिणाम मिळतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन काही आव्हाने आली तरी प्रेमाने व रोमांसाने भरलेले असेल. आपण एकमेकां बरोबर भविष्य विषयक काही विचार - विनिमय कराल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपले नाते अधिक दृढ होईल. आपले विचार दृढ असतील. विद्यार्थ्यांना अध्ययनाचा आनंद घेता येईल आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याची सुरवात चांगली होईल. ह्या संपूर्ण आठवड्यात आपल्या खर्चात वाढ होईल, त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. त्यासाठी कौशल्यपूर्वक आर्थिक नियोजन करावे लागेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी उत्तम आहे. काही समस्या निर्माण झाल्या तरी आपण खंबीरपणे त्यांचे निराकरण करू शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांनी अनुकूल वातावरणाचा फायदा उचलावा. आपणास आपल्या वरिष्ठांच्या नजरेत भरण्याची संधी मिळेल. त्यासाठी आपणास कष्ट सुद्धा वाढवावे लागतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपला जोडीदारा बरोबरचा समन्वय उत्तम असेल. प्रेमीजनांना मात्र काळजी घ्यावी लागेल. आपली एखादी छोटी चूक आपल्या प्रिय व्यक्तीच्या नजरेत मोठी असून त्यांना समजावणे खूप अवघड होऊन बसेल. तेव्हा काळजी घ्यावी. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी उन्नत्तिदायक आहे. आपले अभ्यासात लक्ष लागेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.