Weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - १० ते १६ एप्रिल २०२२; सुट्यांचा आठवडा, कसा जाणार... कोण त्रास देणार, कोण सुख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 07:35 AM2022-04-10T07:35:40+5:302022-04-10T07:45:11+5:30

Weekly Horoscope 10 to 16 April 2022: कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

चैत्र आणि एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १३ एप्रिल रोजी गुरुचा पालट होत आहे. १३ एप्रिल रोजी दुपारी ३.४५ वाजता गुरु कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करत आहे. तर १४ एप्रिल रोजी रवी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करत आहे. ग्रहस्थिती अशी- हर्षल, राहू, बुध मेष राशीत ( १४ पासून रवी पण मेष राशीत), केतू तूळ राशीत, शनी व प्लुटो मकर राशीत, मंगळ, शुक्र, नेपच्यून व गुरु कुंभ राशीत, १३ पासून गुरु मीन राशीत जाईल, चंद्राचे भ्रमण कुर्क, सिंह, कन्या आणि तूळ राशीतून राहील. रविवार, दि. १० एप्रिल २०२२ रोजी चंद्र शुक्ल पक्षातील नवमी तिथी दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री १३.१६ पर्यंत राहील. पुष्य नक्षत्र अहोरात्र राहील, रास कर्क राहील. दिवस चांगला आहे. राम नवमी आहे. राहू काळ सायंकाळी ४.३० ते ६ या वेळेत राहील.

नोकरीत दगदग होईल. कामाचा ताण वाढेल, वरिष्ठांची खप्पा मर्जी राहील; मात्र नवीन संधी नजरेच्या टप्प्यात येताना दिसतील. त्यामुळे कामाचा शीण निघून जाईल, घरी पाहुणे येतील. नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. अभ्यासात प्रगती होईल, तुमचे ज्ञान वाढेल. त्यामुळे इतर लोकांवर प्रभाव पडेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. योग्य आहार व आराम याकडे लक्ष द्या. आर्थिक आवक चांगली राहील, अचानक धनलाभ होईल. काही भेटवस्तू मिळतील. एखादी अपेक्षित संधी मिळेल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

साथ तुम्हाला मिळेल. मोठे लाभ होतील. योग्य मार्गदर्शन मिळेल. चांगल्या व्यक्ती भेटतील. त्याचे महत्त्व ओळखा. आर्थिक आवक चांगली राहील. मोठ्या उलाढाली होतील, भावंडांच्या भेटीगाठी होतील, व्यवसायात बरकत राहील. सतत कार्यरत राहाल. नोकरीत उच्च पद मिळू शकते. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. लोकांची ये-जा चालू राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील वरिष्ठाशी सलोख्याचे संबंध राखणे आवश्यक आहे. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. अनुकूल परिस्थिती राहील, काही अनुकूल घटना घडतील. धनलाभाच्या दृष्टीने चागला काळ आहे. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. घरी पाहुणे येतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात बरकत राहील, मानसन्मान मिळेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. पथ्यपाणी सांभाळा. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. नवीन माहिती कळेल. त्याचा पुढे चालून फायदा होईल. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चागले दिवस.

अडचणी दूर होतील; मात्र कामाचा ताण राहील. एखाद्या सहकाऱ्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल; मात्र संयम राखला तर परिस्थिती आटोक्यात राहील. वाद न वाढवणे हेच या घडीला योग्य ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. बेफिकीर राहू नका. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात बरकत राहील. मात्र मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. पैसे अडकून पडू शकतात. अचानक धनलाभ होऊ शकतो. मुलाची काळजी घ्या. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. टीप रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

मन प्रसन्न राहील थोडी हुरहुर लागून राहील. आळस झटकून कामे करणे आवश्यक आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. काहीना प्रवास करावा लागेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. खाण्या पिण्याची चंगळ राहील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. लोकांच्या भेटीगाठी होतील. प्रेम प्रकरणात यश मिळेल. विवाहेच्छूचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होतील. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल, नावलौकिक वाढवण्याच्या घटना घडतील. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चागले दिवस.

ग्रहांची अनुकूलता आपल्या बाजूने येण्यास सुरुवात होईल. विविध प्रकारचे लाभ होतील. आर्थिक आवक चांगली राहील, मात्र खर्च करण्याकडे कल राहील. मनावरील ताण निघून जाईल. मुलांच्या अडचणी समजून घ्या. त्यांना मदत करा. त्यांच्याशी संवाद साधा. जीवनसाथी चांगली साथ देईल. नात्यात गोडवा राहील. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. सात्वीक अन्न सेवन करावे. अन्यथा आजार डोके वर काढतील. भावंडाशी सख्य राहील, टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

अनुकूल परिस्थितीचा लाभ घ्या. नोकरीत प्रगती होईल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. बदली फायदेशीर ठरेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. काहींना प्रवास करावा लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जीवनसाथी आपल्याला साभाळून घेईल. मुलाचे कौतुक होईल. त्यांना योग्यतेनुसार संधी मिळेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. धार्मिक कार्यात भाग घ्याल. नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

भाग्य साथ देईल: : ग्रहांचे भ्रमण तुम्हाला अनुकूल राहील. भाग्याचे पाठबळ मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. आपल्यावर धनलक्ष्मीची कृपा राहील. चांगल्या संधी चालून येतील. त्या संधीचा फायदा घ्या. उत्तम प्रवास होतील, मित्र मैत्रिणी यांच्या भेटी होतील. घरी पाहुणे येतील. वाहन सुख मिळेल. घरात चैनीच्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत अनुकूल बदल होतील. कायद्याची बंधने पाळा. वाहनाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. कागदोपत्री पूर्तता करण्याच्या बाबतीत हयगय करू नका. टीप- रविवार, सोमवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

चांगल्या घटना घडतील. ग्रहाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. नवीन जबाबदारी अगावर' पडेल. धार्मिक कार्यात मन रमेल, घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखाद्या नातेवाईकाला मदत करावी लागेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. भाग्याची चांगली साथ राहील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. घरी पाहुणे, लोकाची ये-जा राहील, त्यांची आवभगत करण्यात बराच वेळ जाईल. टीप मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

- धनलाभ होईल. ग्रहांची साथ राहील. कामाचा व्याप सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. मात्र तणावाचे व्यवस्थापन नीट केले तर प्रत्येक आघाडीवर यश मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील, तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. भाग्याची साथ राहील. धनलक्ष्मीची कृपा राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. मालमत्तेच्या कामात फायदा होईल. नोकरीत चांगली स्थिती राहील. तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार चांगले दिवस.

स्मार्ट वर्कची गरज : कामाचा ताण राहील. सतत कार्यरत राहाल, दगदग झाल्यामुळे आरोग्यावर ताण पडेल, हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्याचा प्रयत्न कराल तर यश मिळेल आणि ताण पण वाढणार नाही. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. भावंडांशी गैरसमज होतील. नोकरीत वर्चस्व राहील. मालमत्तेची कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक राहील. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

जीवनसाथीचा सल्ला घ्या. समिश्र ग्रहमान राहील. काही अनुकूल घटना घडतील. काही अडचणी येतील, मात्र आपण त्यातून मार्ग काढाल. त्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्र-मैत्रिणी यांच्या नादात वाहवत जाऊ नका. मालमत्तेची कामे होतील, आर्थिक आवक चांगली राहील. मात्र, आर्थिक व्यवहार सांभाळून करा. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. कागदपत्रे वाचून सही करा. टीप रविवार, सोमवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस, -विजय देशपांडे (ज्योतिष विशारद )