Chiplun Flood: घरं वाहून गेली...संसार उघड्यावर...निसर्गरम्य चिपळूणची अशी अवस्था कधीच पाहिली नाही... By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 03:21 PM 2021-07-22T15:21:56+5:30 2021-07-22T15:43:20+5:30
Chiplun Flood: रत्नागिरीत अतिवृष्टीनं खेड आणि चिपळूणमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरीत गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून खेड आणि चिपळूणमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरं वाहून गेली आहेत.
कोकणातील निसर्गरम्य चिपळूण पुरामुळे उद्ध्वस्त झाल्याची ही भयानक दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत.
कोकण म्हटलं की बैठी कौलारू घरं असं समीकरण असतं. पावसात हिरव्यागार डोंगराळ भागात वसलेली ही घरं लक्ष वेधून घेत असतात. पण यावेळी पुराच्या हाहाकारानं चिपळूणमध्ये भयंकर परिस्थिती निर्माण झालीय.
चिपळूण आणि खेडमध्ये अनेक ठिकाणी १२ फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. गेल्या १० तासांपासून पाणी उतरलेलं नाही
अनेक नागरिकांना स्वत:चा जीव वाचवण्यासाठी जवळच्या इमारतींमध्ये आसरा घ्यावा लागत आहे. कौलारु घरं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.
इमारतीचे तळमजले पूर्णपणे पाण्यात गेले आहेत. पुराच्या १० तासांनंतर अखेर एनडीआरएफची एक टीम चिपळूणमध्ये दाखल झाली आहे.
आसमंतातून कोसळणाऱ्या जलधारा आणि जगबुडी नदीचा पूर त्यात समुद्रातही भरती यामुळे कोकणात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालीय.
पुरामुळे अनेक कोकणवासीयांचे संसार कोलमडून वाहून गेले आहेत.
जवळपास ५ हजार लोकांना पुराच्या पाण्यानं विळखा घातल्याचं सांगितलं जात आहे. काही ठिकाणी इमारतीच्या अगदी पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साचलं आहे.
गेल्या १० तासांपासून चिपळूणमध्ये पूरपरिस्थिती कायम असून पुराचं पाणी काही कमी होताना दिसत नाहीय
चिपळूणच्या ग्रामीण भागासह शहरी भाग आणि बाजारपेठेतही महाभयंकर परिस्थिती पाहायला मिळते आहे.
पुराच्या पाण्यात बुडालेल्या वाहनांची ही छायाचित्र पाहूनच चिपळूणमधील गंभीर परिस्थितीची आणि नुकसानाची कल्पना येईल.