Diwali: दिवाळीनिमित्त घराला रंग देताय? येणारे-जाणारे, पै-पाहुणे पाहतच राहतील असे कलर कॉम्बिनेशन... By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 02:22 PM 2024-10-25T14:22:44+5:30 2024-10-25T15:19:40+5:30
Diwali Home Color Ideas: असा रंग द्यायचा जो आपल्यालाही प्रसन्न वाटेल आणि येणा-जाणाऱ्यांनाही छान वाटला पाहिजे. अनेकांनी दिवाळीनिमित्त घराच्या रंगरंगोटीला सुरुवात केली असेल, अनेक जण करणार असतील.
कोणता कलर द्यायचा, कोणता छान वाटेल आदी अनेक विचार मनात येत असतील.
असा रंग द्यायचा जो आपल्यालाही प्रसन्न वाटेल आणि येणा-जाणाऱ्यांनाही छान वाटला पाहिजे.
अशा काही रंग संगती आहेत, ज्या घरात फॉल सिलिंग, इंटेरिअर नसले तरी ते घर उठावदार करून टाकू शकतात.
अशाच काही रंगसंगती आम्ही आज घेऊन आलो आहोत. ज्यात तुमचे घर अगदी परदेशांतील, सिनेमांतील घरांप्रमाणे दिसेल.
सूर्यप्रकाश चांगला येत असेल तर थोडा डार्क कलर, सोबत थोडा फेंट कलर, ऑफ व्हाईट, फेंट हिरवा असे अनेक कलर कॉम्बिनेशन आहेत. एकदा चेक करा...
बेडरुमसाठी शांत वातावरण हवे असते, त्यासाठी देखील वेगवेगळ्या रंगसंगती असतात.
हॉलमध्ये पाहुणे मंडळी, मित्र यांची रेलचेल असते. यामुळे तिथेही चांगली रंग संगती दिली तर ती त्यांना आकर्षित करू शकते.
किचनमध्ये थोडा चॉकलेटी, थोडा ऑफ व्हाईट कलर दिला तर पुढील काही वर्षे भिंती अगदी नव्या सारख्या दिसू शकतात.
रंग दिल्यानंतर भिंतीवर काही डाग पडले तर ते पुसता यावेत असा कलर द्या, जेणेकरून रंग देण्याची पुढची वेळ येईपर्यंत भिंती खराब दिसणार नाहीत.
चांगला सूर्य प्रकाश येत असेल तर ही रंगसंगती छान आहे.
चांगला सूर्य प्रकाश येत असेल तर ही रंगसंगती छान आहे.
थोडा डार्क रंग हवा असेल तर चॉकलेटी-व्हाईटची रंगसंगती.
मुलीचा बेडरुम असेल तर तिच्या पसंतीचा पिंक, थोडा फेंट पिंकची रंगसंगती उत्तम ठरेल.