एक गुंठ्यात घर कसे बांधावे? सुंदर प्रशस्त डिझाईन, शेजारी-पाहुणे पाहतच राहतील...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 11:58 AM2024-09-20T11:58:05+5:302024-09-20T12:07:46+5:30

सरकारी यंत्रणांनी कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी आडवाटा काढून शहरांच्या बाहेर गुंठेवारी आजही सुरु आहे. अनेकांनी मोठमोठ्या इमारतींमझ्ये फ्लॅट न घेता थोड्या बाहेरच्या बाजुला गुंठेवारीची जमीन घेतली आहे. त्यात त्यांनी त्यांच्या स्वप्नाचे घर बांधले आहे.

स्वप्नातील घर असले तरी ते बांधताना जागेची अडचन असल्याने खूपच कंजेस्टेड बांधले गेलेले असते. यामुळे ना हॉल मिळत, ना किचन, ना बेडरूम अशी अवस्था असते.

आमच्या पाहण्यात एक अशाच चिंचोळ्या जागेत बांधलेले अत्यंत सुंदर कल्पकतेने सजविलेले घर आले आहे.

शहरात गुंठा घेताना तो चौकोनी तुकडाच मिळेल याची शाश्वती नसते. अनेकदा लांबचेलांग आयताकृती पट्टा असतो. अशा जागेवर या घराचे डिझाईन अत्यंत चपखल बसणारे आहे.

हॉल मोठाचे मोठा, त्याला लागूनच मोठे किचन यात आहे.

वरती बेडरुमला जाण्यासाठी रुंदीने छोटा का असेना जिना देण्यात आलेला आहे. हा जिना एकाच झटक्यात नाही तर व्ही शेपमध्ये बांधलेला आहे.

हॉल खाली जरी असला तरी वरच्या मजल्यावरून थेट सूर्यप्रकाश येण्याची सोय करण्यात आली आहे.

आजकालची घरे सूर्यप्रकाशापासून दूर असतात. वास्तूशास्त्रानुसार घरात सूर्यप्रकाश खेळता असायला हवा. अनेकांच्या घरात २४ तास लाईट लाऊन ठेवावी लागते.

या घराच्या डिझाईनमध्ये तसे नाहीय. अगदी हॉल, किचनमध्ये देखील सूर्य प्रकाश येण्याची सोय आहे. शिवाय किचनकडे छोटेसे देवघरही आहे.

हा १bhk जरी दिसत असला तरी बेडरुमच्या समोर आणखी एक खोली, जसे की स्टडी रुम, लिव्हिंग रूम आहे.