'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 02:20 PM2018-11-14T14:20:04+5:302018-11-14T14:26:43+5:30

प्रचंड गॉसिप- महिला खूप गॉसिप करतात, असं म्हटलं जातं. मात्र काही मुलींची गॉसिपिंगची सवय वयानुसार वाढत जाते. लग्नानंतरदेखील ही सवय कायम राहिल्यास त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.

कमिटमेंटची भीती- नातं भक्कम ठेवण्यासाठी कमिटमेंट महत्त्वाची असते. मात्र एखाद्या मुलीला कमिटमेंटची भीती वाटत असेल, तर तिच्यापासून चार हात लांब राहा. कारण कमिटमेंटशिवाय नातं टिकू शकत नाही.

सर्वकाही मिळवण्याची हाव- महत्त्वाकांक्षी स्वभाव चांगला असतो. मात्र हाव वाईट असते. काही महिलांना फार श्रम न करता सर्वकाही हवं असतं. अशा मुलींसोबत लग्नगाठ बांधू नका. अन्यथा पश्चातापाशिवाय काहीच हाती लागणार नाही.

शॉपिंगची प्रचंड हौस- शॉपिंग न आवडणारी मुलगी तसं कठीणच. मात्र फक्त आणि फक्त शॉपिंग करणाऱ्या, वस्तूंना माणसांपेक्षा अधिक महत्त्व देणाऱ्या व्यक्तीची निवड साथीदार म्हणून करु नका.

पार्टी प्रेमी- पार्टी, ड्रिंक्स आणि डान्समध्ये बुडालेल्या मुलींपासून दूर राहा. कधीतरी पार्टीला जाणं ठीक असतं. मात्र फक्त आणि फक्त पार्टी करणारी मुलगी असेल, तर दहावेळा विचार करा आणि मगच निर्णय घ्या.

नकारात्मक विचार करण्याची सवय- नकारात्मक विचार करण्याची सवय अतिशय वाईट असते. या सवयीमुळे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळे अशी सवय असणाऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचा विचार करत असाल, तर तो विचार लगेच सोडून द्या.